नाशिक : १५० वर्षांपूर्वी ज्या उद्दिष्टांनी रेडक्रॉस स्थापन झाली ती काहीशी मागे पडली असली तरी काळानुरूप झालेल्या कार्य बदलात लोकसहभाग लाभत गेल्याने रेडक्रॉस यशस्वी ठरल्याचे मत ब्रिगेडियर ए़ एम़ वर्टी यांनी येथे व्यक्त केले़इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या शाखेत १५१ व्या रेडक्र ॉस दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते़ ब्रिगेडियर वर्टी व उपस्थितांच्या हस्ते रेडक्रॉसचे संस्थापक सर हेन्री ड्युनांट यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले़ याप्रसंगी संस्थेचे सचिव मेजर पी़ एम़ भगत, हृदयरोगतज्ज्ञ डॉ़ अनिरुद्ध धर्माधिकारी, डॉ़ चंद्रशेखर नामपूरकर, डॉ़ प्रशांत भुतडा, डॉ़ प्रतिभा औंधकर, डॉ़ अनिल गोसावी, डॉ़ नितीन बिर्ला आदि उपस्थित होते़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलका दुबे यांनी केले़ आभार डॉ़ गोसावी यांनी मानले़
लोकसहभागामुळे रेडक्रॉसचे यश : वर्टी
By admin | Updated: May 10, 2014 00:00 IST