शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

हवामान खात्यात ११०० पदांची भरती : मराठी युवकांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 22:23 IST

दिवसेंदिवस महत्त्वाच्या होत चालेल्या हवामान खात्यात वैज्ञानिक सहायक पदासाठी तब्बल ११०२ जागा भरण्यात येणार असून, त्यासाठी राज्यातील हवामान खात्यातील संघटनांनी मराठी युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत.

ठळक मुद्देवैज्ञानिक सहायक पदासाठी विज्ञानातील भौतिक शास्त्र पदवीधर (बीएस्सी प्रथमश्रेणी) वैज्ञानिक सहायक पदासाठी तब्बल ११०२ जागा यापूर्वी खात्यामार्फत साडेचारशे पदांची भरती झाली

नाशिक : दिवसेंदिवस महत्त्वाच्या होत चालेल्या हवामान खात्यात वैज्ञानिक सहायक पदासाठी तब्बल ११०२ जागा भरण्यात येणार असून, त्यासाठी राज्यातील हवामान खात्यातील संघटनांनी मराठी युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. यापूर्वी खात्यामार्फत साडेचारशे पदांची भरती झाली होती, त्यावेळी एकही मराठी युवक निवडला गेला नव्हता. त्या पार्श्वभूमीवर खात्यातील संघटनांनी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.देशात सध्या हवामान खाते महत्त्वाचे ठरले आहे. देशभरात सात प्रादेशिक हवामान केंद्राच्या अखत्यारीत एकूण आठशेवर कार्यालय आहेत. या कार्यालयांमध्येच आता ११०२ पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी या आधी ४ आॅगस्ट ही आॅनलाइन अर्जासाठी अंतिम मुदत होती, मात्र आता ती वाढवून १४ आॅगस्ट अशी करण्यात आली आहे. वैज्ञानिक सहायक पदासाठी विज्ञानातील भौतिक शास्त्र पदवीधर (बीएस्सी प्रथमश्रेणी) या शैक्षणिक पात्रतेवर आधारित आहे. तथापि, यापूर्वीच्या अनुभवावरून एम एस्सी, बी. टेक. बी. ई. उमेदवार मोठ्या प्रमाणात परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. सध्या भरावयाच्या पदांसंदर्भात स्टाफ सिलेक्शनच्या एसएससी.निक या लिंकवर सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सदरच्या पदासाठी आॅनलाइन अर्ज केल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना आॅन जॉब ट्रेनिंग दिले जाते. हवामानविषयक उपकरणे व साधने वापरण्याचे तंत्रज्ञान दिले जाते. स्थानिक लोकाधिकार समिती व काही संघटना या भरतीत सहभागी होण्यासाठी मराठी युवकांना मार्गदर्शन करण्यास तयार असून, अधिक माहितीसाठी राजेश तांबे, प्रादेशिक सचिव, मुंबई तसेच, यशवंत साटम, सरचिटणीस, स्थानिक लोकाधिकार समिती, कुलाबा वेधशाळा, मुंबई येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.