शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

तांत्रिक दोष सारून आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 19:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक :  ग्रामीण आरोग्य मिशन अंतर्गत करण्यात येणा-या कर्मचारी भरतीतील तांत्रिक दोष दूर करण्यात आले असून, ...

ठळक मुद्देगुणवत्तेनुसार निवड : पारदर्शी प्रक्रिया राबविल्याचा दावा एका जागेसाठी तीन उमेदवारांना निवडीसाठी बोलाविण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक :  ग्रामीण आरोग्य मिशन अंतर्गत करण्यात येणा-या कर्मचारी भरतीतील तांत्रिक दोष दूर करण्यात आले असून, गेल्या दोन दिवसांपासून सुमारे दीडशेहून अधिक कर्मचाऱ्यांना थेट नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. या भरतीविषयी उमेदवारांकडून केले गेलेले आरोप जिल्हा परिषद प्रशासनाने फेटाळून लावतानाच भरती पारदर्शी पद्धतीने झाल्याचा दावा केला आहे.

गेल्यावर्षी आॅगस्ट महिन्यात सदर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. आरोग्य खात्यांतर्गत नर्सिंग, आरोग्य सेविका, तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, समन्वयक, सल्लागार, वैद्यकीय अधिकारी अशा पदांसाठी सुमारे २५० हून अधिक कर्मचारी, अधिकाºयांची भरती प्रक्रिया निवड समितीमार्फत राबविण्यात आली. तथापि, या भरतीला मार्च महिन्यात मुहूर्त लागला आहे. या भरतीसाठी शासकीय व निमशासकीय सेवेत काम केल्याचा अनुभव असणे क्रमप्राप्त करण्यात आले होते. मात्र, काही उमेदवारांनी खासगी रुग्णालयांमध्ये केलेल्या कामाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र सादर केल्यामुळे गोंधळ उडाला होता. खासगी रुग्णालयाच्या अनुभव प्रमाणपत्रालाही गुणदान करण्यात आल्याने अनेक उमेदवारांची नावे यादीत समाविष्ट झाली होती. प्रत्यक्षात दुसºया यादीतून या उमेदवारांची नावे कमी करण्यात आल्याने या भरतीत गैरप्रकार केल्याच्या संशयाला पुष्टी मिळत होती. तथापि, निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी भरतीसाठी शासनाने लागू केलेल्या नियमानुसारच भरती करण्याचे ठरवून सर्व उमेदवारांच्या अर्जांची छाननी करण्याच्या सूचना दिल्या व त्यातून खासगी रुग्णालयातील अनुभवाचे प्रमाणपत्र ग्राह्य न धरण्याचा निर्णय घेतल्यामुळे या भरतीसाठी निव्वळ शासकीय व निमशासकीय रुग्णालयातील अनुभवच वैध ठरविला. त्यानुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर करून एका जागेसाठी तीन उमेदवारांना निवडीसाठी बोलाविण्यात आले. बुधवारी व गुरुवारी दोन्ही दिवस रिक्त असलेल्या जागांवर समुपदेशनाने जागेवरच नियुक्तीपत्र देऊन प्रशासनाने पारदर्शी भरती करून संशयाला दूर ठेवले आहे. गेल्या दोन दिवसांत सुमारे दीडशेहून अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिली.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद