शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वाहनचालकांकडून लाखो रुपयांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:37 IST

इंदिरानगर-वडाळारोडवरील साईनाथनगर चौफुली व सह्याद्री रुग्णालयालगत असलेल्या स्वयंचलित सिग्नलवर वाहतूक पोलीस नसल्याने वाहनचालकांकडून नियमांची सर्रासपणे पायमल्ली होत असताना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांनी दुसरीकडे मात्र हेल्मेट सक्तीचा आग्रह धरून सरकारच्या तिजोरीत लाखो रुपयांचा महसूल गोळा करण्यावर भर दिल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

इंदिरानगर : इंदिरानगर-वडाळारोडवरील साईनाथनगर चौफुली व सह्याद्री रुग्णालयालगत असलेल्या स्वयंचलित सिग्नलवर वाहतूक पोलीस नसल्याने वाहनचालकांकडून नियमांची सर्रासपणे पायमल्ली होत असताना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांनी दुसरीकडे मात्र हेल्मेट सक्तीचा आग्रह धरून सरकारच्या तिजोरीत लाखो रुपयांचा महसूल गोळा करण्यावर भर दिल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.  सह्याद्री रुग्णालय व साईनाथनगर चौफुलीवर असलेल्या सिग्नलवर चार रस्ते एकत्र येतात. यामध्ये दोन महामार्ग आणि परिसरातील विविध उपनगरला ये-जा करण्यासाठी वडाळा-पाथर्डी हा मुख्य रस्ता असल्याने दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. परंतु दिवसभर वाहतूक पोलीस कर्मचारी नसल्याने सिग्नलचे वाहनचालक पालन करत नाही त्यातूनच दररोज लहान-मोठे अपघात होऊन हमरीतुमरीच्या घटना घडतात. मात्र त्याची दखल पोलीस यंत्रणा घेत नाही, उलट या सिग्नलच्या आजूबाजूला उभे राहून हेल्मेट नसलेल्या वाहनचालकांना अडवून त्यांना हेल्मेटची सक्ती व परिणामी पाचशे रुपये दंड करण्यावर पोलीस भर देतात.परंतु दिवसभर वाहतूक पोलीस कर्मचारी नसल्याने सिग्नल यंत्रणेचे कोणीही पालन करत नाही. तशीच परिस्थिती साईनाथनगर चौफुलीवरील सिग्नलवर आहे. या सिग्नलवर चार रस्ते एकत्र येतात. त्यामध्ये मुंबई महामार्गाकडून जॉगिंग ट्रॅकमार्गे, पुणे महामार्गाकडून वडाळागाव मार्ग व मुंबई महामार्गाकडून विनयनगर मार्गे आणि वडाळा-पाथर्डी रस्ता नगरमार्ग असे मुख्य रस्ते एकत्र येतात. यामध्ये दोन महामार्ग आणि वडाळा-पाथर्डी हा मुख्य रस्ता येत असल्याने दिवसभर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. परंतु साईनगर चौफुली आणि सह्याद्री रु ग्णालय या दोन्ही सिग्नलवर वाहतूक कर्मचारी अनियमित असल्याने वाहनधारक नियमाची पायमल्ली करत सर्रास मार्गक्र मण करतात. त्यातूनच दररोज लहान-मोठे अपघात होऊन हमरीतुमरीच्या घटना घडतात. तातडीने दोन्ही सिग्नलवर कायमस्वरूपी वाहतूक कर्मचारी देण्याची मागणी शिवसेना प्रणित सुचितानगर मित्रमंडळाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष सरप्रितसिंह बल, अश्विन देसले, विवेक सोनवणे, सुबोध बोरसे, कौशिक पाटील, बबलू शेख यांनी केली आहे.चौफुलीवर वारंवार अपघातसाईनाथनगर चौफुलीवर वारंवार अपघात होऊन जखमी आणि जीवितहानी होण्याच्या घटना घडत असल्याने परिसरातील संतप्त नागरिकांनी तीव्र आंदोलन केल्यावर सुमारे चार वर्षांपूर्वी सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली, परंतु वाहतूक पोलीस कर्मचारीअभावी शोभिवंत वस्तू बनून राहिली आहे, अशी तक्र ार नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Policeपोलिसtraffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडी