पाटोदा : रब्बी हंगामासाठी पालखेड कालव्यास आवर्तन सोडण्यात आले आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची गरज असतांना आवर्तन सोडण्यात आल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपासून पालखेड कालव्यास पाणी सोडण्यात यावे अशी मागणी शेतकरी वर्गाने केली होती. तसेच यासंदर्भात मागील आठवडयात मंत्रालयात पालकमंत्री छगन भुजबळ व दादा भुसे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती.यावर्षी कालवा व धरण लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने तीन महिन्यांपेक्षा जास्त दिवस ओव्हरफ्लो आवर्तन सोडण्यात आले होते.या आवर्तनातून येवला तालुक्यातील सर्व लहान- मोठे बंधारे भरण्यात आले होते. त्यामुळे यावर्षी पिकांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे.गहू, हरभरा व भाजीपाला पिके घेण्यात आली आहेत. मात्र काही दिवसांपासून विहिरीतील पाण्याचा उपसा लवकर होत असल्याने पिकांना पाणीटंचाईचा फटका बसला होता. त्याचप्रमाणे येवला तालुक्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष व डाळिंब बागा असून त्यांनाही पाणीटंचाईची झळ बसण्यास सुरु वात झाली होती. त्यामुळे शेतकरी वर्गातून आवर्तन सोडण्याची मागणी होत होती.
पालखेडच्या आवर्तनाने शेतकऱ्यांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 00:34 IST
रब्बी हंगामासाठी पालखेड कालव्यास आवर्तन सोडण्यात आले आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची गरज असतांना आवर्तन सोडण्यात आल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपासून पालखेड कालव्यास पाणी सोडण्यात यावे अशी मागणी शेतकरी वर्गाने केली होती.
पालखेडच्या आवर्तनाने शेतकऱ्यांना दिलासा
ठळक मुद्देपाटोदा : परिसरात आनंदाचे वातावरण