शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

लासलगावला कांद्याच्या भावामध्ये विक्रमी घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 01:25 IST

कांद्याचे किमान निर्यात मूल्य कमी केल्यानंतरही निर्यातीमध्ये न झालेली वाढ, राज्यातील तसेच परराज्यातील बाजारपेठांमध्ये वाढलेली मोठी आवक यामुळे लासलगावच्या कांदा बाजारामध्ये सोमवारी सरासरी दरामध्ये ९०० रुपयांची घसरण झाल्याने बळीराजा धास्तावला आहे.

लासलगाव : कांद्याचे किमान निर्यात मूल्य कमी केल्यानंतरही निर्यातीमध्ये न झालेली वाढ, राज्यातील तसेच परराज्यातील बाजारपेठांमध्ये वाढलेली मोठी आवक यामुळे लासलगावच्या कांदा बाजारामध्ये सोमवारी सरासरी दरामध्ये ९०० रुपयांची घसरण झाल्याने बळीराजा धास्तावला आहे.  केंद्र सरकारने मागील सप्ताहामध्येच कांद्याच्या किमान निर्यात मूल्यामध्ये कपात केल्याची घोषणा केली होती. सध्या श्रीलंका वगळता इतर देशांमध्ये कांदा निर्यात थंडावलेली आहे.तसेच लाल कांद्याबरोबरच रांगडा कांद्याची राज्यभरातील सर्वच बाजारपेठेत नेहमीपेक्षा सुमारे तिप्पट आवक होत आहे.  याशिवाय गुजरातसह मध्य प्रदेश व इतर राज्यांत होत असलेली कांदा आवक याचा संयुक्त परिणाम महाराष्ट्रातील लासलगाव सह विविध बाजारपेठांमध्ये जाणवत आहे. कांदा भावात वेगाने घसरण होत असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.  मागील सप्ताहात मंगळवारनंतर लासलगावला सोमवारी (दि. २९) कांद्याचे लिलाव झाले.मागील बंद भावाच्या तुलनेत सोमवारी किमान भावात ६००, कमाल भावात ७५२ तर सरासरी भावात नऊशे रूपये प्रतिक्विंटल घसरण झाली . सोमवारी लिलावात किमान ९०० , कमाल भाव २४०० तर सरासरी १९५१ रूपये भाव जाहीर झाला.  सरासरी भाव कमी झाल्याने कांद्याचा उत्पादन खर्चही भरून निघणारा नाही . त्यामुळे शेतकºयांच्या चिंतेत वाढ झाली आहे.  या सप्ताहात गुजरात बरोबरच मध्य प्रदेश सह इतर राज्यांत नवीन कांदा बाजारपेठेत दाखल झाल्याने महाराष्ट्रातील तेजीत असलेल्या कांद्याची मागणी कमी झाली. सोमवारपासून कांदा भावात कमालीची घसरण झाली. जोरदार थंडी आणि पोषक हवामान यामुळे कांदा एकरी उत्पादन चांगले येत आहे. .तसेच पुणे, लोणंद व अहमदनगर भागातील कांदा बाजारपेठेत तिप्पट आवक होत आहे.  गुजरात बरोबरच महाराष्ट्रात पुणे , लोणंद ,जळगाव व अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरसह सर्व आवारात अधिक कांदा आवक वाढलेली आहे. त्याचा परीणाम म्हणून आता कांदा भाव घसरण झाल झाली आहे. उन्हाळ कांदा मार्च महीन्यात बाजारपेठेत दाखल होईल . - नितीन जैन, कांदा व्यापारी, लासलगाव या वर्षी महाराष्ट्रात लाल कांद्याचे भाव टिकून होते त्यामुळे कांदा उत्पादकांमध्ये समाधानकारक वातावरण आहे. परंतु पुणे भागातील कांदा बाजारपेठेत दाखल झाला आहे. तसेच गुजरात व राजस्थान मधील कांदा आवक वाढली आहे. आता कांदा भावात सातत्य रहावे. या करीता कांदा किमान निर्यात मुल्य कमी करावे. किंवा शुन्य इतके केले तर कांदा निर्यात वाढीस मदत होईल. - नानासाहेब पाटील संचालक , नाफेडमागणीपेक्षाही पुरवठा जास्त असल्याने केंद्र शासनाने कांदा निर्यात मुल्य कमी केले पाहीजे . तसेच कांदा आवकेत वाढ होणार असल्याने भाव कमी झाल्यावर किमान आधारभूत किमतीत कांदा खरेदी करण्यासाठी नियोजन आताच केले पाहीजे. कारण सरासरी भाव पातळी ९०० रूपये इतकी कमी झाली आहे- जयदत्त होळकर , सभापती ,लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती. निर्यात सुरू नाहीबाजारात नवीन आवक वाढलेली असताना केंद्र सरकारने कांद्याचे किमान निर्यात मूल्य १५० डॉलरने कमी करून ७०० डॉलर प्रतिटन केले आहे . परंतु श्रीलंका वगळता अन्य कोणत्याही देशामध्ये सध्या कांद्याची निर्यात सुरू नाही.यामुळे देशांतर्गंत बाजारपेठेमध्ये कांद्याच्या दरामध्ये घट होऊ लागली आहे.

टॅग्स :onionकांदाMarket Yardमार्केट यार्ड