नाशिक : जिल्हा परिषदेचा २0१४-१५चा विक्रमी ४६ कोटी २0 लाखांचा अर्थसंकल्प अर्थ व बांधकाम सभापती अलका जाधव यांनी सादर केला. त्यात रस्ते दुरुस्तीसाठी वाढीव दोन कोटी ८७ लाख तर शाळा दुरुस्तीसाठी ५0 लाखांची तरतूद ३0 लाखांनी वाढवून ८0 लाख धरण्यात आली, तर पशुसंवर्धन विभागाच्या पावणे दोन कोटींच्या तरतुदीतून ५७ लाख कमी करून ते अन्यत्र वळविण्याचा निर्णय झाला. सभा गुंडाळल्याचा आरोप करीत मनसे, भाजपा व माकपच्या सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांना सभा संपल्यानंतर घेराव घातला.अध्यक्ष जयश्री पवार यांच्या उपस्थितीत अर्थसंकल्पाची विशेष सभा बोलविण्यात आली होती. त्यावेळी उपाध्यक्ष संपतराव सकाळे, सभापती राजेश नवाळे, अलका जाधव, सुनीता अहेर, ज्योती माळी, मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर आदि उपस्थित होते.अलका जाधव यांनी दुसर्यांदा अर्थसंकल्प सादर करीत असल्याचे सांगत आपल्याच काही सदस्यांचे भाकीत आपण खोटे ठरविले, असे स्पष्ट करीत २0१३-१४ चा मूळ ४0 कोटी ६५ लाखांचा व २0१४-१५ चा सुधारित ४६ कोटी २0 लाखांचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात सदस्यांनी दुरुस्ती सुचवित हा अर्थसंकल्प मंजूर केला. विभागनिहाय केलेल्या तरतुदी पुढीलप्रमाणे- कंसात कमी/अधिक केलेली तरतूद- सामान्य प्रशासन विभाग ४ कोटी १0 लाख (-३0 लाख), शिक्षण- २ कोटी १४ लाख (+३0 लाख), बांधकाम- १५ कोटी ७६ लाख (एकूण २ कोटी २७ वजा करून रस्ते देखभाल दुरुस्तीसाठी २ कोटी ८७ लाख वाढविले.) लघुपाटबंधारे- ३ कोटी ६५ लाख, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग- ४ कोटी ९0 लाख, आरोग्य विभाग-७५ लाख ५0 हजार (-४ लाख), कृषी विभाग- २ कोटी ३२ लाख, पशुसंवर्धन विभाग- १ कोटी ७८ लाख (-५७ लाख), समाजकल्याण- ७ कोटी ४३ लाख, महिला व बालकल्याण- २ कोटी ५0 लाख, ग्रामपंचायत विभाग- ८२ लाख असा एकूण ४६ कोटी २0 लाखांचा अर्थसंकल्प सर्वानुमते दुरुस्तीसह मंजूर करण्यात आला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे या वर्षापासून प्रथमच चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत प्रविष्ट होणार्या सर्वसाधारण संवर्गातील विद्यार्थ्यांची सर्व परीक्षा फी भरण्यासाठी शिक्षण विभागाने २५ लाखांची तरतूद केली आहे.
विक्रमी ४६ कोटींचा अर्थसंकल्प सादर
By admin | Updated: May 22, 2014 22:19 IST