नाशिक : राज्य सरकारने १३१४ मराठी शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा, तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या नाशिक शाखेतर्फे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना बुधवारी निवेदन देण्यात आले. याप्रसंगी मनविसेचे नाशिक शहराध्यक्ष श्याम गोहाड, नाशिक जिल्हाध्यक्ष गणेश मोरे, मनसे तालुकाध्यक्ष रमेश खांडबहाले, जिल्हा सरचिटणीस शशिकांत चौधरी, शहर उपाध्यक्ष अमर जमधडे, अवधूत पवार, प्रसाद घुमरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शाळा बंदच्या निर्णयावर फेरविचाराची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:09 IST