शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

प्रेम व आकषर्णातील भेद ओळखून विवेकी बुद्धीने निवडा साथीदार -महेंद्र नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 18:46 IST

युवा संकल्प परिषदेत ‘जोडीदाराची विवेकी निवड’ या विषयावर महेंद्र नाईक व निशा फडतरे यांनी उपस्थितांना प्रेम आणि आकर्षण यांतील भेद लक्षात आणून देतानाच विवाहाच्या प्रचलित पद्धती आणि परिचयोत्तर विवाह संकल्पना याविषयी मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देतरुणांनी प्रेम आणि आकर्षण यातील भेदे ओळखावा अंनिसतर्फे नाशकाच युवा संकल्प परिषद उत्साहात

नाशिक : प्रेम आणि आकर्षण या दोन वेगवेगळ्या गोष्टी असून, आयुष्याचा जोडीदार निवडताना या दोन्ही गोष्टींमध्ये फरक करता येणे आवश्यक आहे. त्यामुळे जोडीदार निवडण्याची प्रक्रिया ही विवेकी बुद्धीने होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अंनिसचे महेंद्र नाईक यांनी केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नाशिक यांच्यातर्फे मविप्रच्या फार्मसी महाविद्यालयात गुरुवारी (दि.६) राज्यव्यापी युवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून आयोजित युवा संकल्प परिषदेत ‘जोडीदाराची विवेकी निवड’ या विषयावर महेंद्र नाईक व निशा फडतरे यांनी उपस्थितांना प्रेम आणि आकर्षण यांतील भेद लक्षात आणून देतानाच विवाहाच्या प्रचलित पद्धती आणि परिचयोत्तर विवाह संकल्पना याविषयी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर अंनिसचे राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. सुदेश घोडेराव, जिल्हा सचिव अ‍ॅड. समीर शिंदे उपस्थित होते. महेंद्र नाईक म्हणाले, प्रेमात हिंसेला स्थान नसते. परंतु, प्रेम आणि आकर्षण यातील फरक समजला नाही तर चुकीचा जोडीदार निवडला जाऊन त्याचे विपरीत परिणाम समोर येतात. त्यामुळे जोडीदार विवेकी विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. निशा फडतरे म्हणाल्या, कथा, कादंबºया, नाटक, सिनेमा आणि वेगवेगळ्या वाहिन्यांच्या मालिकांमधून दाखविले जाणारे प्रेम हे मूळ प्रेमाच्या भावनेपासून खूप दूर आहे. अशा माध्यमातून केवळ प्रेम लादण्याची भाषा दिसून येते. प्रत्यक्षात प्रेम हे परस्परांच्या संमतीने होते. परंतु हा विचारच मागे पडल्याने महाराष्ट्रासह देशभरात एकतर्फी प्रेमातून हिंसाचाराचे प्रकार घडत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. जोडीदार निवडण्याच्या प्रक्रियेत पालकांची भूमिका महत्त्वाची असून, पालक आणि मुलांमध्ये जोडीदार निवडण्याची प्रक्रिया लादली न जाता दोघांमधील संवादातून ही प्रक्रिया घडणे आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. दरम्यान, तरुणांना जोडीदार निवडण्याच्या प्रक्रियेविषयी मार्गदर्शन करण्यासाठी अंनिसने व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून विशेष अभ्यासक्रम चालविला असून, या मोहिमेत सहभागी होऊन तरुणांनी त्यांच्या आयुष्यातील जोडीदाराची विवेकी पद्धतीने निवड करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. दिलीप डेर्ले यांनी,  सूत्रसंचालन प्रा. सुप्रिया संधान यांनी केले. तर डॉ. मिलिंद वाघ यांनी आभार मानले. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकcollegeमहाविद्यालय