शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

विद्यापीठ अनुदान आयोगाची संदीप विद्यापीठास मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 16:54 IST

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या तज्ज्ञ समितीच्या- निरीक्षणे / सूचनांच्या संदर्भात संदीप विद्यापीठाने सादर केलेल्या अहवालाचा स्वीकार करीत विद्यापीठ अनुदान आयोगाने महाराष्ट्रात सर्वप्रथम संदीप विद्यापीठास मान्यताप्राप्त राज्य खाजगी विद्यापीठ म्हणून घोषित केल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू कुलगुरू प्रा. एन. रामचंद्रन यांनी विद्यापीठात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली.

ठळक मुद्देविद्यापीठ अनुदान आयोगाकडून संदीप विद्यापीठाला मान्यता युजीसीची मान्यता मिळविणारे पहिले स्वयंअर्थसहाय्य विद्यापीठ कुलगुरू प्रा. एन. रामचंद्रन यांची पत्रकार परिषदेत माहीती

नाशिक : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या तज्ज्ञ समितीच्या- निरीक्षणे / सूचनांच्या संदर्भात संदीप विद्यापीठाने सादर केलेल्या अहवालाचा स्वीकार करीत विद्यापीठ अनुदान आयोगाने महाराष्ट्रात सर्वप्रथम संदीप विद्यापीठास मान्यताप्राप्त राज्य खाजगी विद्यापीठ म्हणून घोषित केल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू कुलगुरू प्रा. एन. रामचंद्रन यांनी शनिवारी (दि.२७) विद्यापीठात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली. नवी दिल्लीतील विद्यापीठ अनुदान आयोगाच्या तज्ज्ञ समितीने विविध विद्याशाखा, पायाभूत सुविधा, आर्थिक  क्षमता व व्यवहार्यता, शिक्षण, संशोधन आणि परीक्षांचे मानक निश्चित करण्यासाठी संदीप विद्यापीठास भेट देऊन केले पाहणी व पडताळणीनंतर ही मान्यता देण्यात आली असून आता विद्यापीठाचे नॅक मानांकन प्राप्त करण्याकडे लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. संदीप फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदिप झा यांच्या कल्पनेतून संदीप विद्यापीठ महाराष्ट्र राज्य खाजगी विद्यापीठ कायद्याअंतर्गत स्थापित करण्यात आले. सुमारे ३०० एकरच्या विस्तीर्ण परिसरात पसरलेल्या कॅम्पसमध्ये आजमितीला ३००० हून अधिक विद्यार्थी वेगवेगळ््या विद्याशाखांचे शिक्षण घेत असून त्यांना २००  शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र, व्यवस्थापन, कायदा, वाणिज्य, व्यवस्थापन आणि विज्ञान इत्यादी क्षेत्रात डिप्लोमा पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी साठी उच्च शिक्षण घेत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विद्यापीठाचे कुलसचीव डॉ. चेतन चौधरी व शैक्षणिक अधिष्ठाता अरुण द्विवेदी दिवेदी उपस्थित होते. 

आठ महाविद्यालातून अध्यापन संदीप विद्यापीठात आठ विविध विद्यालयांतून पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा अभ्यासक्रमांचे अद्यापन सुरू आहे. यात नाविण्यपूर्ण अभ्यासक्रम, पसंती आधारित क्रेडिट सिस्टम, विद्यार्थी केंद्रित आणि रोजगार-केंद्रित शिक्षण यासह विविध शाखांमध्ये अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी, कायदा, वाणिज्य आणि व्यवस्थापन, विज्ञान, औषधशास्त्र विज्ञान, सामाजिक विज्ञान, फॅशन डिझाईन आणि सौंदर्यप्रसाधने विज्ञान आदी शाखांचा समावेश आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकuniversityविद्यापीठStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय