शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
2
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
3
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
4
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
5
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
6
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
7
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
8
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
9
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
10
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
13
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
14
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
15
वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
16
‘लोक माझ्यावर जळतात, माझ्याविरोधात…’, पराभवानंतर अजिंक्य रहाणे संतापला, टीकाकारांवर बरसला
17
Peace Of Mind: नातं की ओझं? भगवान बुद्धांच्या 'या' एका सूत्राने दूर होईल तुमच्या मनातील सर्व गोंधळ!
18
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
19
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
20
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
Daily Top 2Weekly Top 5

दारणा फाटा ते कवडदरा रस्त्याला मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 00:44 IST

वाडीवऱ्हे : घोटी-सिन्नर, नाशिक-मुंबई तसेच समृद्धी महामार्ग या तीन महामार्गांना जोडणाऱ्या दारणा फाटा (वाडीव-हे जवळ) ते कवडदरा फाटा या रस्त्याच्या प्रस्तावाला नुकतीच मंत्रिमंडळाच्या पायाभूत समितीने मान्यता दिली आहे. हा रस्ता १६ किलोमीटरचा असून याकामी सुमारे २५० कोटी रुपये खर्च येणार आहे.

ठळक मुद्दे१६ कि.मी.चा रस्ता : कनेक्टीव्हीटी वाढणार

वाडीवऱ्हे : घोटी-सिन्नर, नाशिक-मुंबई तसेच समृद्धी महामार्ग या तीन महामार्गांना जोडणाऱ्या दारणा फाटा (वाडीव-हे जवळ) ते कवडदरा फाटा या रस्त्याच्या प्रस्तावाला नुकतीच मंत्रिमंडळाच्या पायाभूत समितीने मान्यता दिली आहे. हा रस्ता १६ किलोमीटरचा असून याकामी सुमारे २५० कोटी रुपये खर्च येणार आहे.या रस्त्यामुळे घोटी येथील एस.एम.बी.टी. रुग्णालयाची कनेक्टीव्हिटी तसेच इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना आपला शेतीमाल अवघ्या काही मिनिटात नाशिकमध्ये पोहचविणे सोपे होणार आहे. नाशिक येथून मुंबईला जाणाऱ्यांची संख्या मोठी असून, रस्त्यात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवाशांची मोठी कुचंबणा होत असते. प्रवाशांच्या वेळेत बचत व्हावी, याबरोबरच इगतपुरी तालुक्यातील गावागावामधील दळणवळण वाढण्यासाठी दारणा फाटा ते कवडदरा फाटा यादरम्यान रस्ता असावा, अशी ग्रामस्थांची मागणी होती. या प्रस्तावित १६ किलोमीटरच्या रस्त्याला मंत्रिमंडळाच्या पायाभूत समितीने नुकतीच मान्यता दिली आहे. घोटी-सिन्नर महामार्गावर कवडदरा फाटा असून, नाशिक-मुंबई महामार्गावर दारणा फाटा आहे. कवडदरा फाटा ते दारणा फाटा हे अंतर १६ किलोमीटरचे आहे. या रस्त्यावर बेळगाव कुऱ्हे, अस्वली स्टेशन, दारणा डॅम, साकूर फाटा, कवडदरा आदी गावे आहेत. या प्रस्तावित रस्त्याला पायाभूत समितीने मान्यता दिल्याने आता लवकरच कामास प्रारंभ होणार आहे.सुमारे २५० कोटीचा खर्चसदर रस्त्याचे काम २५० कोटी रुपयाचे असून बांधकामावर प्रत्यक्ष खर्च १६२.७ कोटी रुपये होणार आहे. उर्वरित खर्च भूसंपादनासाठी होणार आहे. या रस्त्यावर चार मोठे पूल तर तीन लहान पूल असणार आहेत. ३७ पाईप मोऱ्या असून २ मोठे आणि १५ लहान चौक असणार आहेत. या रस्त्यासाठी ४०.७३ हेक्टर जमिनीची गरज असून, पैकी २३.१३ हेक्टर जमीन उपलब्ध आहे. त्यामुळे १७.६० हेक्टर जमीन अधिग्रहित करावी लागणार आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाTravel Tipsट्रॅव्हल टिप्स