मतदानासाठी ओळखपत्र आवश्यक आयोगाकडून सतरा पुराव्यांना मान्यता

By admin | Published: February 20, 2017 12:06 AM2017-02-20T00:06:49+5:302017-02-20T00:07:02+5:30

मतदानासाठी ओळखपत्र आवश्यक आयोगाकडून सतरा पुराव्यांना मान्यता

Recognition of the identity card for the voting of seventeen evangelicals | मतदानासाठी ओळखपत्र आवश्यक आयोगाकडून सतरा पुराव्यांना मान्यता

मतदानासाठी ओळखपत्र आवश्यक आयोगाकडून सतरा पुराव्यांना मान्यता

Next

  नाशिक : मंगळवारी मतदान होत असलेल्या नाशिक महानगरपालिका व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदारांना ओळखपत्र सक्तीचे करण्यात आले असून, त्यासाठी निवडणूक आयोगाने मतदारांना स्वत:ची ओळख पटवून देण्यासाठी सतरा प्रकारच्या पुराव्यांना मान्यता दिली असून, या पुराव्यांशिवाय कोणत्याही मतदाराला मतदान करता येणार नाही. मंगळवार, दि. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी सात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत नाशिक महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मतदान घेण्यात येणार असून, या निवडणुकीसाठी पात्र ठरविण्यात आलेल्या मतदारांना मतदान करण्यासाठी ओळखपत्र आवश्यक करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भात काढलेल्या आदेशान्वये ज्या मतदारांकडे मतदार ओळखपत्र म्हणजे निवडणूक आयोगाने दिलेले कार्ड नसेल अशांसाठी ओळखीचा पुरावा म्हणून पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, पॅनकार्ड, छायाचित्र असलेले पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र, केंद्र सरकार, राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम किंवा उद्योग संस्थेने दिलेले छायाचित्र ओळखपत्र, बॅँक किंवा पोस्टाचे छायाचित्र असलेले पासबुक (खाते ३१ डिसेंबर २०१६ किंवा तत्पूर्वी उघडलेले असावे), पट्टे किंवा प्रॉपर्टी नोंदणी छायाचित्र असलेले कागदपत्र, ३१ डिसेंबरपूर्वी देण्यात आलेली छायाचित्र असलेली शिधापत्रिका, सक्षम अधिकाऱ्याद्वारे देण्यात आलेले एससी, एस टी किंवा ओबीसींचे छायाचित्र असलेले प्रमाणपत्र, ३१ डिसेंबरपूर्वी देण्यात आलेला छायाचित्र असलेला शस्त्र परवाना, सक्षम अधिकाऱ्याने ३१ डिसेंबरपूर्वी दिलेला छायाचित्र असलेला अपंगत्वाचा दाखला, आधार कार्ड अथवा रजिस्टर जनरल आॅफ इंडियातर्फे देण्यात आलेले एनपीआरचे स्मार्ट कार्ड अशा १३ पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा सोबत असणे आवश्यक आहे. ओळखीचा पुरावा असल्याशिवाय मतदान करता येणार नाही, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. मतदानासाठी बाहेर पडणाऱ्या मतदारांनी आपले मतदान कोणत्या केंद्रावर आहे याची खात्री करून घ्यावी. तत्पूर्वी निवडणूक यंत्रणेकडून त्यांना घरोघरी मतदान चिठ्ठी देण्यात येणार आहे. या चिठ्ठीवर मतदाराचे नाव, मतदार यादी व भाग क्रमांक नमूद असणार असल्याने त्याच्या माध्यमातून मतदारांना मतदार यादीत नाव शोधणे व मतदान केंद्र शोधणे सहज शक्य होणार असल्याची माहिती निवडणूक यंत्रणेने दिली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Recognition of the identity card for the voting of seventeen evangelicals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.