शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
2
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
3
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
4
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
5
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
6
Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुलींमध्ये असतो कमालीचा आत्मविश्वास आणि सौंदर्याचा अहंकारही 
7
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
8
Corona Vaccine : कोरोना लसीमुळे तरुणांचा होतो अचानक मृत्यू? AIIMS आणि ICMR च्या रिसर्चमधून मोठा खुलासा
9
'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
10
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
11
२० वर्षे लहान असलेल्या सारासोबत रणवीरचा रोमान्स का? 'धुरंधर पार्ट २'मध्ये उलगडणार सर्वात मोठं गूढ
12
लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
13
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
14
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
15
Ram Vilas Vedanti: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख रामविलास वेदांती यांचे निधन; सीएम योगींनी वाहिली श्रद्धांजली
16
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
17
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
18
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
19
Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
20
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
Daily Top 2Weekly Top 5

महापौरपदासाठी भाजपमध्ये बंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 00:56 IST

महाशिव आघाडी पॅटर्नमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिकच्या महापौरपदासाठी भाजप-शिवसेनेसह अन्य इच्छुकांनी बुधवारी (दि.२०) अर्ज दाखल केले. मात्र, भाजपच्या वतीने तीन जणांना अर्ज दाखल करण्यास सांगितले जात असताना प्रत्यक्षात पाच नगरसेवकांनी अर्ज दाखल केले आहेत,

नाशिक : महाशिव आघाडी पॅटर्नमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिकच्या महापौरपदासाठी भाजप-शिवसेनेसह अन्य इच्छुकांनी बुधवारी (दि.२०) अर्ज दाखल केले. मात्र, भाजपच्या वतीने तीन जणांना अर्ज दाखल करण्यास सांगितले जात असताना प्रत्यक्षात पाच नगरसेवकांनी अर्ज दाखल केले आहेत, त्यातही माजी आमदार बाळासाहेब सानप समर्थक कमलेश बोडके यांनी बंडखोरी करीत परस्पर अर्ज दाखल केला आहे.उपमहापौरपदासाठीही ११ जणांनी अर्ज दाखल केले असून, त्यातदेखील बोडके आणि सुनीता पिंगळे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे महापौरपदाचे अर्ज दाखल होत असतानाच त्याचवेळी या दोघांनी सेना नेते तसेच संपर्क प्रमुखांच्या उपस्थितीतच अर्ज दाखल केले आहेत. बोडके यांनी शिवसेनेच्या आदेशानुसारच प्रवेश केल्याचे स्पष्ट केल्याने भाजपमध्ये अधिकृत फूट पडली आहे. बोडके आणि पिंगळे यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेत अर्ज दाखल केले तर त्यांना सूचक आणि अनुमोदक म्हणून सह्या करणाºय एकूण सहा नगरसेवकांची बंडखोरी उघड झाली त्यांना भाजपचा फुटीर म्हणूनमहापालिकेतील सध्याच्या कारकिर्दीत ज्यांना यापूर्वी पदेच मिळाली नाहीत त्यांना संधी देण्याचे निश्चित झाल्यानंतर सतीश कुलकर्णी, दिनकर आढाव आणि शशिकांत जाधव यांना महापौरपदासाठी, तर भिकुबाई बागुल, अरुण पवार, अलका आहेर आणि गणेश गिते यांना अर्ज दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी अर्ज दाखल केले आहेत. भिकुबाई बागुल आणि गणेश गिते यांनीदेखील महापौरपदासाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यानंतर शिवसेनेच्या वतीने अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, सत्यभामा गाडेकर आणि विलास शिंदे यांनी जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केले. मात्र त्याचवेळी त्यांच्या बरोबर भाजपमधून शिवसेनेत गेलेले माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे समर्थक मानले जाणारे कमलेश बोडके यांनी महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाच, परंतु त्यांच्याबरोबरच सुनीता पिंगळे यांनीही उमेदवारी दाखल केली.संशय असलेल्या सानप समर्थक नगरसेवकांनीच सूचक आणि अनुमोदक म्हणून सह्या दिल्या आहेत.भाजप पाच प्रकारेव्हीप बजावणारभाजपच्या वतीने ६५ नगरसेवकांना व्हीप बजावणार आहे. त्यामुळे एकदा उमेदवाराचे नाव निश्चित झाले की, त्यासंदर्भातील कार्यवाही सुरू होईल. बंडखोरी टाळण्यासाठी आणि त्यानंतरही बंडखोरी झालीच तर संबंधितांवर कारवाईसाठी कायदेशीर मार्ग अवलंबण्यात येणार आहे. नगरसेवकांना प्रत्यक्ष भेटून व्हीप बजावतानाच मोबाइलचे एसएमएस, व्हॉट्सअ‍ॅप, त्याचप्रमाणे त्यांच्या घरावरदेखील व्हीप चिटकवण्यात येईल. जे टाळाटाळ करतील त्यांच्यासाठी वृत्तपत्राच्या माध्यमातूनदेखील प्रकटन देण्यात येणार आहे. यापूर्वी ज्या नगरसेवकांनी सहलीवर येण्यास टाळाटाळ केली त्यांच्या फोनवरील मॅसेज आणि निरोपाचेदेखील पुरावे ठेवण्यात आले आहे.गिरीश महाजन आज नाशकातभाजपचे संकटमोचक मानले जाणारे माजी पालकमंत्री गिरीश महाजन हे गुरुवारी (दि.२१) नाशिकमध्ये येणार आहेत. त्यानंतर निवडणुकीची सर्व सूत्रे त्यांच्या ताब्यात येणार आहेत. २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत मनसेचे अवघे ४० नगरसेवक असताना त्यांची सत्ता मिळवली होती. मात्र आता भाजपकडे ६५ नगरसेवक असूनदेखील सत्ता कायम टिकवण्याचे आव्हान महाजन यांच्यासमोर आहे. त्यामुळे महाजन आता काय खेळी करतात याकडे भाजपचेदेखील लक्ष लागून आहे. दरम्यान, भाजपचे उत्तर महाराष्टÑ संघटनमंत्री किशोर काळकर दोन दिवसांपासून नाशिकमध्ये तळ ठोकून असून त्यांनीदेखील फुटीरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे.बोडके शिवसेनेत दाखलकमलेश बोडके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपमध्ये गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून आपल्यावर अन्याय झाला. आता उद्धव ठाकरे, भाऊसाहेब चौधरी आणि बाळासाहेब सानप यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे सांगून भाजपला सोडचिठ्ठी दिल्याचेच एकप्रकारे जाहीर केले. पक्षात माझ्यासारखाच अनेकांवर अन्याय झाला आहे, असे सांगून त्यांनी बुधवारी (दि.२०) शिवसेनेच्या जिल्हा संपर्क प्रमुखांच्या आदेशानुसारच उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे सांगितले आणि त्यांच्या आदेशानुसार मागेही घेऊ, असे सांगितले. विशेष म्हणजे त्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर तत्काळ बाहेर पडलेल्या भाऊसाहेब चौधरी यांनी बोडके आणि पिंगळे यांच्या उमेदवारीवर भाष्य करणे टाळले होते.सेनेला महापौर, तर सानपसमर्थकास उपमहापौरपद४महापालिकेत सध्या महाशिव आघाडीचा प्रयोग राबविण्यात येणार असून, त्यात शिवसेनेला महापौरपद मिळेल, तर उपमहापौरपद मिळवण्यासाठी आघाडीला दिले जाण्याची शक्यता आहे. त्यातच भाजप समर्थकांनी उपमहापौरपद दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापौरच नव्हे तर उपमहापौरपदासाठीदेखील स्पर्धा वाढणार आहे.भाजपला त्रासदायक ठरणारे बाळासाहेब सानप यांच्या समर्थकांनी आता उघडपणे पक्ष विरोधी भूमिका घेण्यास प्रारंभ केला आहे.कमलेश बोडके यांना मच्छिंंद्र सानप हे सूचक, प्रियंका माने अनुमोदक आहेत. तर उपमहापौरपदासाठी पूनम धनगर सूचक आणि विशाल संगमनेरे अनुमोदक आहेत.सुनीता पिंगळे यांना सीमा ताजणे आणि अनिता सातभाई अनुक्रमे सूचक आणि अनुमोदक असून, त्यामुळे भाजपची अडचण झाली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMayorमहापौरElectionनिवडणूकBJPभाजपाGirish Mahajanगिरीश महाजन