शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

स्वागत फलक हटविण्यावरून तापले ‘राज’कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 01:20 IST

मिशन महापालिकेसाठी दाखल झालेल्या राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी लावलेले फलक महापालिका आणि पेालीस यंत्रणेने हटवून अनोखे स्वागत केले. कार्यकर्त्यांनी त्यास विरोध करून रास्ता राेको सुरू केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र, त्यानंतरही फलक हटविण्यात आल्याने राजकारण तापले. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक फलक हटविल्याचा आरोप केला, तर मनसेचे नेते संदीप शिंदे यांनी खासदार संजय राऊत यांच्या आदेशानेच पोलीस कारवाई करीत असल्याचा आरोप केला.

ठळक मुद्देनाशकात अनोखे ‘स्वागत’: रास्ता रोकोचा प्रयत्नभाजपबरोबरच शिवसेनेवर आरोप

नाशिक : मिशन महापालिकेसाठी दाखल झालेल्या राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी लावलेले फलक महापालिका आणि पेालीस यंत्रणेने हटवून अनोखे स्वागत केले. कार्यकर्त्यांनी त्यास विरोध करून रास्ता राेको सुरू केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र, त्यानंतरही फलक हटविण्यात आल्याने राजकारण तापले. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक फलक हटविल्याचा आरोप केला, तर मनसेचे नेते संदीप शिंदे यांनी खासदार संजय राऊत यांच्या आदेशानेच पोलीस कारवाई करीत असल्याचा आरोप केला.

महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने संघटनात्मक बांधणीसाठी मनसेचे युवा नेते अमित ठाकरे मंगळवारीच नाशिकमध्ये अन्य नेत्यांसह दाखल झाले. त्यानंतर बुधवारी (दि. २२) राज ठाकरे यांचे दुपारी आगमन झाले. ढोल-ताशे लावून हाॅटेल एसएसके येथे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचे स्वागत केले. काही वेळ थांबून राज ठाकरे खासगी कामासाठी गेले असता महापालिकेचे पथक तेथे धडकले आणि फलक हटविण्याची तयारी करू लागले. जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर तसेच अन्य कार्यकर्त्यांनी महापालिका आणि पोलिसांना विरोध केला. केवळ मनसेचे फलक हटविले जात आहेत. गेले दहा दिवस गणेशोत्सवाचे आणि अन्य पक्षांचे देखील फलक लावले असताना त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही आणि मनसेलाच कायदे, नियम दाखवतात का, असा प्रश्न करून कार्यकर्त्यांनी अडवले. तसेच घोषणाबाजी करून रस्त्यावरच ठिय्या दिला. मात्र, त्यानंतरही महापालिकेने फलक हटविले. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.

दरम्यान, राज ठाकरे यांनी बुधवारी (दि. २२) नाशकात दाखल झाल्यानंतर नाशिकमधील निवडक नेते तसेच मुंबईतील पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली. आज, गुरुवारी सकाळी मनसेच्या नूतन शाख्याध्यक्षांची निवड करून राज ठाकरे यांच्य हस्ते नियुक्तिपत्र दिले जाणार आहे. त्यावेळी ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

कोट....

फलक हटविले, हृदयातून कसे हटविणार

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या सांगण्यावरून राज ठाकरे यांच्या स्वागताचे फलक हटविण्यात आले आहेत. फलक हटले तरी नाशिककरांच्या हृदयात मनसे आणि राज ठाकरे कायम असून, त्यांना कसे हटविणार?

- संदीप देशपांडे, नेता, मनसे

टॅग्स :NashikनाशिकRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसे