परमोच्च आनंदाचा प्रत्यक्षानुभव देणारी वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 12:57 AM2019-07-07T00:57:37+5:302019-07-07T00:59:56+5:30

भोळ्या भाबड्या भाविक भक्तांना- वारकऱ्यांना सर्वाेत्कृष्ट परमोच्च आनंदाचा प्रत्यक्षानुभव देणारा सोहळा म्हणजे वारी. महाराष्टÑाच्या सांस्कृतिक जीवनामध्ये अगदी पुराणकाळापासून कार्यरत असलेला संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय होय आणि या वारकरी संप्रदायाचा मुख्य आचार म्हणजे श्रीक्षेत्र पंढरीची वारी.

The real giving experience of supreme happiness | परमोच्च आनंदाचा प्रत्यक्षानुभव देणारी वारी

परमोच्च आनंदाचा प्रत्यक्षानुभव देणारी वारी

googlenewsNext
ठळक मुद्देवारकरी हे व्रत स्वीकारल्याशिवाय पंढरीची वारी यथार्थ घडत नाही.

भोळ्या भाबड्या भाविक भक्तांना- वारकऱ्यांना सर्वाेत्कृष्ट परमोच्च आनंदाचा प्रत्यक्षानुभव देणारा सोहळा म्हणजे वारी. महाराष्टÑाच्या सांस्कृतिक जीवनामध्ये अगदी पुराणकाळापासून कार्यरत असलेला संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय होय आणि या वारकरी संप्रदायाचा मुख्य आचार म्हणजे श्रीक्षेत्र पंढरीची वारी.
या संप्रदायाचे पाईकत्व स्वीकारलेला वारकरी हा अगदी नित्यनियमाने वारी करीत असतो. वारकरी हा शब्दच मूळचा वारीकर असा आहे. या शब्दात वारी म्हणजे येरझारा आणि कर म्हणजे करणारा. आपल्या उपास्थ देवाच्या घराला आस्थाबुद्धीने पुन्हा-पुन्हा जाणे याचा अर्थ आहे वारी करणे. पण वारकरी झाल्याशिवाय वारीचा आणि पंढरीचा महिमा कळत नाही. म्हणून विधीच अशी आहे की अगोदर वारकरी व्हावं आणि मग पंढरपूरला वारीला जावं. याबाबत जगदगुरू तुकोबाराय म्हणतात.
होय, होय वारकरी । पाहे पाहे रे पंढरी ।।
याचा अर्थ असा की वारकरी हे व्रत स्वीकारल्याशिवाय पंढरीची वारी यथार्थ घडत नाही. वारकरी होणे म्हणजे नेमके काय आहे, ते ज्ञानोबाराय सांगतात, बाबा कामेनी, वाचेनी आणि मनाने परमात्मा पंढरीनाथाला शरण जाणं म्हणजे वारकरी होणं आहे. माउली म्हणतात,
काया वाचा, मने जीवे सर्वस्वी उदार।
बाप रखुुमा देवीवरू, विठ्ठलाचा वारकरी।।
संत-महात्मे हे वारकरी होऊनच पंढरीनाथाकडे गेले आणि परमात्म स्वरूप झाले. वारकरी झाल्याशिवाय यर्थार्थ घडत नाही. म्हणून अगोदर होय होय वारकरी.
अशीही भोळ्या-भाबड्या वारकरी भाविक-भक्तांना आनंद देणारी वारी आमच्या परम भाग्याने आम्हाला पिढीजातच लाभली आहे. ज्यांनी हे वारकरी व्रत स्वीकारले आहे. जो काया वाचा मनाने वारकरी झाला आहे. त्या वारकºयाला वारी जवळ आली की पंढरीच्या वारीचे वेध लागतात. सदा सर्वकाळ त्याचे मन फक्त पंढरीच्या वारीतच रमते. पंढरी हे सगळ्या वारकरी संतांचे माहेरघर आहे. ते म्हणतात की, पांडुरंग आमचा पिता आहे, रखुमाई आमची माता, पुंडलिकराया आमचा बंधू आहे, तर चंद्रभागा ही आमची बहीण आहे. याचा अर्थ असा पंढरपूर हे संतांचं माहेर आहे.
वास्तविक दिंडीला पायी जाणे हे वाटते तेवढे सोपे नाही. दिवसभर चालावे लागते. रात्री कपड्याच्या तंबूत मुक्काम करावा लागतो. पाऊस आला तर रात्रभर बसून राहावे लागत. पंढरीमध्ये जे मिळेल तेच खावे लागते. दररोज पहाटे गार पाण्याने स्नान करावे लागते. दैनंदिन जगण्याच्या हे सगळं विरूद्ध आहे. प्रतिकूल आहे तरीही या कशाचीही काहीही तमा न बाळगता हा पंढरीनाथाचा वारकरी अगदी न चुकता नित्यनियमाने पंढरीची वारी करतो.
वारकरी नियमाने वारी करतो, कारण वारीच्या या अपूर्ण आनंदाची त्याला प्रत्याक्षानुभूती होत असते. एकंदरीत वारीचा हा जो सगळा सुखसोहळा आहे तो अपूर्व आहे. या वारीच्या सोहळ्याचे वर्णन शब्दांनी करणे अशक्यच आहे. ज्या क्षेत्राची आणि ज्या देवाची वारी आहे त्या क्षेत्राचा आणि त्या देवाचा महिमा अपरंपार आहे. पंढरीच्या वारीला आले म्हणजे विश्वातल्या सगळ्या तीर्थक्षेत्रांची वारी केल्याचे पुण्य मिळते असे वर्णन आहे. चंद्रभागेत स्रान केले तर जगातल्या सगळ्या तिर्थांचे स्नान केल्याचे पुण्य मिळते. पांडुरंग दर्शन घेतले म्हणजे जगातल्या सर्व देवांच्या दर्शनाचे पुण्य मिळते. एकच वारीत सर्वच पुण्य प्राप्त करून देणारे क्षेत्र, तीर्थ, देव आणि भक्त जगात दुसरे कुठेच तुम्हाला पहायला मिळत नाही.
असा अनादी सिद्ध असणाºया पंढरीच्या आषाढी वारीसाठी संपूर्ण महाराष्टÑातून आणि इतरही प्रांतातून संतांच्या पालख्या लाखो वारकऱ्यांसह निघालेल्या आहेत. ज्ञानोबारायांच्या पालखीसोबत कित्येक वर्षांपासून परदेशी वारकरी, पुरुष-महिला दरवर्षी नित्यनियमाने येताना पाहिले आहे. असाही वारीचा अपूर्व आनंद आहे. खरोखर हा आनंद शब्दांकित करणे शक्य नाही. जीवन कृतार्थ करणारी आणि जिवाला अपूर्व असा परमानंद देणारी पंढरीची वारी प्रत्येकाला जन्मोजन्मी घडो यासाठी संत-महात्मे पांडुरंगाला प्रार्थना करतात.
(लेखक अखिल भारतीय वारकरी मंडळाचे महाराष्टÑ राज्याचे उपाध्यक्ष आहेत)

 

 

 

 

 

Web Title: The real giving experience of supreme happiness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.