शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

रेडिमेड गारमेंट साड्यांची दालने गजबजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:46 IST

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील रेडिमेड कपडे आणि साड्यांची दालने गजबजली आहेत. शहरातील विविध दालनांतून महिलावर्गाकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू आहे. डिझायनर साड्या आणि ड्रेस मटेरियल्सला महिला वर्गाची विशेष पसंती मिळते आहे. शहरात साड्या आणि कपड्यांची १०० कोटी रुपयांहून अधिक उलाढाल होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

नाशिक : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील रेडिमेड कपडे आणि साड्यांची दालने गजबजली आहेत. शहरातील विविध दालनांतून महिलावर्गाकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू आहे. डिझायनर साड्या आणि ड्रेस मटेरियल्सला महिला वर्गाची विशेष पसंती मिळते आहे. शहरात साड्या आणि कपड्यांची १०० कोटी रुपयांहून अधिक उलाढाल होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.  दिवाळीचे आणि दिव्यांचे, फराळाचे नाते जसे घट्ट तसेच ते फटाके आणि नवे कपडे यांचेही नेमके हेच समीकरण आहे. जवळपास सर्वच शासकीय आणि खासगी कर्मचा-यांच्या हाती बोनसचा पैसा खेळू लागल्याने शहरात दिवाळीच्या खरेदीने जोर धरला आहे. खरेदीत महिलावर्गाने आघाडी घेतली असून, शहरातील जवळपास सर्वच नामांकित साड्यांची दालने नववधूप्रमाणे सजली आहेत. दिवाळी आणि त्यानंतर दहाच दिवसांनी लागणारी लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर शहरातील साड्यांच्या दालनात विविध आकर्षक आॅफर्सही देण्यात आल्याने साड्यांची खरेदी जोरात आहे. काही दुकानदारांनी आकर्षक भेटवस्तूही ग्राहकांना देण्यास सुरुवात केल्याने ग्राहकवर्ग खूश आहे. नव्या पॅटर्नमधील ड्रेस मटेरियल अगदी पाचशे रुपयांपासून बाजारात उपलब्ध असल्याने तरुणी व महिला वर्गाकडूनही याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लहान मुलींच्या रेडिमेड साड्या, घागरा-चोली तर मुलांसाठी धोती-कुरता आणि ब्लेझर वेस्कट आदी कपडेही लक्ष वेधून घेत आहेत.नवा ट्रेण्ड येतोयदिवाळी आणि लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर केवळ शालू किंवा दुल्हन साडी खरेदी करायचा ट्रेण्डमागील काही वर्षांपर्यंत दिसून येत होता; मात्र आता दुल्हनकडून घागरा-ओढणीलाही पसंती दिली जात आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण यंदा ४० टक्क्यांनी वाढले आहे. अगदी चार-पाच हजार रुपयांपासून घागरा ओढणी उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालयीन तरुण-तरुणींकडून बॅ्रण्डेड जिन्स, ट्राऊजर सोबतच ट्रेंडी टी-शर्टला पसंती मिळत आहे.

टॅग्स :DiwaliदिवाळीNashikनाशिकMarketबाजार