शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

सव्वा लक्ष ग्रंथ वाचकांच्या दारी !

By admin | Updated: September 2, 2016 01:03 IST

कुसुमाग्रज प्रतिष्ठान : विनायक रानडेंनी जमविली दीड कोटींची ग्रंथसंपदा

नाशिक : तुमच्या वाढदिवशी शुभेच्छांचा पहिला फोन सकाळी-सकाळी खणखणतो आणि ग्रंथदेणगीचा शब्द घेऊनच तो थांबतो. ग्रंथचळवळीला एक नवा आयाम देणारा आणि मायमराठीचा चोहीकडे प्रसार करणारा अवलिया विनायक रानडे यांनी कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या सहा वर्षांपासून अथक परिश्रमातून ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमाची घोडदौड सुरू ठेवली आहे. प्रारंभी मित्र-आप्त नातेवाइकांपासून सुरू झालेल्या या उपक्रमाची व्याप्ती पार सातासमुद्रापलीकडे जाऊन पोहोचली आहे. आजवर लोकसहभागातून रानडे यांनी दीड कोटी रुपयांची सव्वा लक्ष ग्रंथसंपदा जमा करत ती वाचकांच्या दारी नेऊन पोहोचविली आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त असलेल्या विनायक रानडे यांनी २००९ मध्ये ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली. लोकांना ग्रंथभेटीसाठी प्रवृत्त करत रानडे यांनी उपक्रमाची वाटचाल सुरू केली. शंभर पुस्तकांची एक पेटी तयार करत ती सुुरुवातीला नाशिकमध्येच विविध महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या मंडळांपर्यंत नेऊन पोहोचविली. उपक्रमाला वाढता प्रतिसाद बघता रानडे यांचाही हुरूप वाढत गेला आणि म्हणता म्हणता आजच्या घडीला दीड कोटी रुपयांची सव्वा लक्ष ग्रंथसंपदा त्यांनी अपार कष्टातून उभी केली आहे. रानडे यांनी आतापर्यंत १२५० ग्रंथपेट्या तयार केल्या असून, त्या नाशिकसह अहमदनगर, औरंगाबाद, पुणे, ठाणे, वाई, सातारा, कराड, फलटण, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, जळगाव, धुळे, कोकण, नवी मुंबई, मुंबई, बडोदा, गोवा, सिल्वासा, बेळगाव इथपासून ते दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचल्या आहेत. एवढेच नव्हे तर ही ग्रंथचळवळ सातासमुद्रापलीकडेही घेऊन जाण्याची जिद्द रानडे यांनी बाळगली आणि दुबई, टोकिओ, नेदरलॅँड, स्वीत्झर्लंड, अ‍ॅटलांटा आणि आॅस्ट्रेलिया या देशांतील मराठी माणसांनाही ग्रंथपेटीने आकर्षित केले. रानडे इथवरच थांबलेले नाहीत तर त्यांनी नाशिक जिल्ह्यातील अतिदुर्गम अशा आदिवासी भागातील पाड्यांवरही ग्रंथपेट्या वाचकांची ज्ञानलालसा भागवित आहेत. नाशिकसह ठाणे, पुणे, नागपूर, मुंबई येथील कारागृहातील बंदीवानांनाही ज्ञान वाटण्याचे काम रानडे करत आहेत. विविध हॉस्पिटल्समध्येही नुकतीच या उपक्रमाची सुरुवात झालेली आहे. विशेष म्हणजे सव्वा लक्ष ग्रंथसंपदा जमवताना रानडे यांनी केवळ मायमराठीचीच निवड केली आहे. त्यात असंख्य अनुवादित पुस्तकांचाही समावेश आहे. लहान वयातच मुलांना वाचनाची आवड लागावी यासाठी बालवाचकांकरिता सुमारे २५० ग्रंथपेट्या तयार करण्यात आल्या आहेत. या ग्रंथपेट्यांमध्ये आजच्या तरुण पिढीची गरज लक्षात घेता मराठीबरोबरच इंग्रजी पुस्तकांचाही समावेश करण्यात आला आहे. अतिशय नि:स्वार्थ भावनेने ग्रंथचळवळ राबविणाऱ्या रानडे यांच्या या उपक्रमाची प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असताना दखल घेतली होती आणि खास प्रशस्तिपत्रक पाठवून गौरविले होते. ग्रंथचळवळीतील या अवलियावर दुर्दैवाने मात्र साहित्य संमेलनांवर लाखोंची माया उधळणाऱ्या ना शासनाची नजर पडली ना बड्या संस्थांची. नाशिकचे हे ग्रंथभूषण मात्र अटकेपार मायमराठीचा झेंडा रोवून आले आहे. (प्रतिनिधी)