शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

‘हाऊसफुल्ल’ प्रयोगाने नाटकांचा पुनश्च हरि ओम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 1:07 AM

कोरोनाच्या धास्तीनंतर प्रथमच नाशिकच्या रंगभूमीवर पाऊल ठेवलेल्या महाराष्ट्राच्या दोन्ही लाडक्या नटांना नाशिकच्या रंगभूमीने मनमुराद दाद देत नाटकाचे प्रयोग हाऊसफुल्ल केले. विशेष म्हणजे दोन्ही नाटके रविवारच्या एकाच दिवशी असूनही नाशिककरांचा लाभलेला प्रतिसाद दोन्ही नटांसह सर्वच रंगकर्मींसाठी अत्यंत सुखद धक्का ठरला. 

ठळक मुद्देकोरोनानंतरची गोष्ट :  प्रशांत दामले,  भरत जाधव यांना नाशिककरांची मनमुराद दाद

नाशिक : कोरोनाच्या धास्तीनंतर प्रथमच नाशिकच्या रंगभूमीवर पाऊल ठेवलेल्या महाराष्ट्राच्या दोन्ही लाडक्या नटांना नाशिकच्या रंगभूमीने मनमुराद दाद देत नाटकाचे प्रयोग हाऊसफुल्ल केले. विशेष म्हणजे दोन्ही नाटके रविवारच्या एकाच दिवशी असूनही नाशिककरांचा लाभलेला प्रतिसाद दोन्ही नटांसह सर्वच रंगकर्मींसाठी अत्यंत सुखद धक्का ठरला. मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून कोरोनामुळे ठप्प झालेल्या नाशिकच्या रंगभूमीला पुन्हा गतवैभव मिळण्यास तब्बल दहा महिन्यांचा कालावधी लागला आहे. नाशिकच्या रंगभूमीवर १७ तारीखला आपले नाटक येणार असल्याचे प्रशांत दामले यांनी फेसबुकसह विविध समाज माध्यमांव्दारे त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवले होते. त्यामुळे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच या नाटकाची निर्धारित संख्येच्या तुलनेत निम्मी तिकिटे  विकली गेली होती. त्यानंतर शनिवारपासून तर अगदी मोजकीच तिकिटे शिल्लक  राहिल्याचे कळल्यानंतर प्रशांत दामले यांनी स्वत: रविवारी सकाळी तिकीट काऊंटरवर बसून प्रेक्षकांना तिकीट विक्री केली. स्वत: प्रशांत दामले तिकीट खिडकीवर आहेत, असे समजताच प्रेक्षकांनीदेखील उर्वरित सर्व तिकिटे खरेदी करीत हाऊसफुल्लचा फलक झळकवला. कालिदासच्या नूतनीकरणानंतर देखील पहिला प्रयोग दामले यांच्याच नाटकाचा लागला होता तो प्रयोग तर  हाऊसफुल्ल झाला होता. नाट्यगृहाबाहेर रसिक प्रेक्षकांच्या रांगाn    रविवारी कालिदास कलामंदिरामध्ये सकाळ आणि सायंकाळ असे दोन प्रयोग लागले होते. या दोन्हीही नाटकांना रसिकांनी प्रतिसाद दिला. नाट्यगृहाबाहेर प्रेक्षकांच्या रांगा लागल्या होत्या. रसिकांचे थर्मल स्कॅनिंग करून नाट्यगृहात प्रवेश देण्यात आला. n    ‘भरत येतोय परत’ म्हटल्यावर त्याच्यावर नितांत प्रेम करणाऱ्या नाशिककरांनीदेखील  दोन आठवडे आधीच निम्म्याहून अधिक तिकिटांची खरेदी केली होती. रविवारी सकाळीच भरत जाधवच्या नाटकाची सर्व तिकीट विक्री झाल्याने रविवारी दोन्ही प्रयोगांना हाऊसफुल्लचा फलक झळकल्याचे  चित्र कालिदासमध्ये पहायला मिळाले. n    दोन्ही नाटकांना ऑनलाइन बुकिंगबरोबरच आगाऊ तिकीटविक्रीला प्रतिसाद दिला. शासन आदेशानुसार ५० टक्केच उपस्थिती असली तरी तेवढी उपस्थिती १०० टक्के लावली.  

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिकPrashant Damleप्रशांत दामलेBharat Jadhavभरत जाधव