शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

रवि पाटील, असाल तेथून परत या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 00:55 IST

रवि पाटील, तुम्ही असाल तेथून परत या. महापालिकेशी संबंधित तुमचे काही प्रश्न असतील तर ते नक्कीच सोडवू, असे आवाहन महापौर रंजना भानसी यांनी गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेले नगररचना विभागातील सहायक अभियंता रवींद्र पाटील यांना केले आहे.

नाशिक : रवि पाटील, तुम्ही असाल तेथून परत या. महापालिकेशी संबंधित तुमचे काही प्रश्न असतील तर ते नक्कीच सोडवू, असे आवाहन महापौर रंजना भानसी यांनी गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेले नगररचना विभागातील सहायक अभियंता रवींद्र पाटील यांना केले आहे. दरम्यान, महापौरांनी मंगळवारी (दि.२९) पाटील कुुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला, तर पोलीस आयुक्तांचीही भेट घेऊन तपासाला गती देण्याची विनंती केली.  महापालिकेतील नगररचना विभागातील सहायक अभियंता रवींद्र पाटील गेल्या शनिवार (दि.२६) पासून बेपत्ता आहेत. त्यांनी पाठीमागे ठेवलेल्या चिठ्ठीमुळे त्यांच्या बेपत्ता होण्याचे गूढ वाढले आहे. पाटील यांच्या शोधार्थ पोलिसांची पथके रवाना झालेली आहेत मात्र, अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागू शकलेला नाही. त्यामुळे पाटील कुटुंबीय प्रचंड तणावाखाली आहे. मंगळवारी (दि.२९) महापौर रंजना भानसी यांनी पाटील कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. यावेळी, महापौरांनी पत्रकारांशी बोलताना रवि पाटील हे जेथे कुठे असतील, त्यांनी तेथून परत यावे, असे आवाहन केले. महापालिकेशी संबंधित त्यांचे काही प्रश्न असतील तर ते सोडविले जातील, परंतु त्यांनी आपल्या कुटुंबीयासाठी टोकाचे पाऊल उचलू नये, असेही महापौरांनी सांगितले. महापालिकेतील अन्य कर्मचाऱ्यांचे काही प्रश्न असतील तर त्यांचीही दखल घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर, महापौरांनी पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांची भेट घेऊन तपासाच्या प्रगतीबद्दल चर्चा केली. यावेळी, पोलीस आयुक्तांनी तपासासाठी पोलीस पथके पाठविली असून, नातेवाइकांसह सर्व शक्यता तपासून पाहिल्या जात असल्याचे सांगितले. यावेळी, महापौरांसमवेत स्थायी समिती सभापती हिमगौरी अहेर, नगरसेवक भगवान दोंदे उपस्थित होते.आयुक्तांच्या माजी पीएची पोस्टआयुक्त कार्यालयात यापूर्वी स्वीय सचिव म्हणून काम पाहणाºया कैलास दराडे यांनी सोशल मीडियावर कर्मचाºयांना आवाहन करणारी एक पोस्ट टाकली आहे. गेल्या सिंहस्थापासून मनपातील अधिकारी-कर्मचारी हे खरोखरच प्रचंड तणावाखाली काम करत असल्याचे सांगत दराडे यांनी आपले सहकारी ठाकरे आणि प्रवीण राजपूत यांचे आजारपणामुळे झालेल्या आकस्मिक मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. तणावाची स्थिती असली तरी स्वत:कडे दुर्लक्ष करू नका, आनंदी रहा, असे सांगत रवि पाटील लवकरच परत येतील, अशी आशा व्यक्त केली आहे.आसू आणि हसूरवींद्र पाटील यांची कन्या भाग्येशा सिम्बॉयसीस स्कूलमध्ये शिक्षण घेत असून, तिने इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती. मंगळवारी सीबीएससी दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात भाग्येशाने ८७ टक्के गुण संपादन केले. परंतु, एका डोळ्यात आसू आणि दुसºया डोळ्यात हसू अशी स्थिती अनुभवणाºया चिमुरड्या भाग्येशाला दहावीच्या निकालाचा आनंद घेता आला नाही. सोमवारी (दि.२८) भाग्येशाचा वाढदिवस होता, तर मंगळवारी (दि.२९) दहावीचा निकाल. या दोन्ही आनंदाच्या क्षणी पप्पांचा फोन येईल, या आशेने भाग्यश्री प्रतीक्षा करत होती. परंतु, काहीच प्रतिसाद न मिळाल्याने कुटुंबीय प्रचंड तणावाखाली आहे.कामाचा ताणरवि पाटील यांच्या पत्नी शीतल यांनी म्हटले आहे, गेल्या काही दिवसांपासून अति कामामुळे ते तणावात होते. नवीन आयुक्त आल्यापासून त्यांच्या कामाचा ताण वाढला होता. शनिवारी (दि. २६) वॉक विथ कमिशनरला जायचे म्हणून ते सकाळी लवकर उठले. सोमवारी मुलीचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने तरी त्यांचा फोन येईल याची आम्ही वाट पाहत होतो असे सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका