घोटी : इगतपुरी तालुक्यातील बलायदुरी शिवारातील रेन फॉरेस्ट या पंचतारांकित हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री सुरू असलेली रेव्ह पार्टी पोलिसांनी छापा टाकत उधळल्यानंतर फरार झालेल्या मुख्य सूत्रधाराला गुरुवारी इगतपुरी पोलिसांनी राहत्या घरातून अटक केली. अटकेतील संशयित कीटकनाशक कंपनीचा संचालक असून, त्यानेच कल्याण, भिवंडी आणि नाशिक येथून रेव्ह पार्टीसाठी अल्पवयीन मुली या हॉटेलात आणल्या होत्या, अशी माहिती सूत्रांनी दिली.बलायदुरी शिवारातील रेन फॉरेस्ट हॉटेलात काही युवक, युवती अर्धनग्न अवस्थेत नृत्य करीत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांसह सरपंच कैलास भगत यांनी इगतपुरी पोलिसांना दिली. पोलीस पथकाने छापा टाकला असता बंदिस्त खोलीत पुणे येथील जी.एम.बायोसीड्स या खते, बियाणे उत्पादन करणाºया कंपनीच्या संचालकासह अन्य युवक आणि सात अल्पवयीन युवती डीजेवर अर्धनग्न अवस्थेत मद्याच्या नशेत नृत्य करीत होते.
रेव्ह पार्टीचा मुख्य सूत्रधार जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:18 IST