शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
4
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
5
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
6
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
7
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
8
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
9
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
10
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
11
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
12
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
13
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
14
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
15
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
16
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
17
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
18
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
19
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
20
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं

रेशन दुकानांची होणार वर्गवारी

By admin | Updated: October 14, 2015 23:48 IST

४७ दुकानांवर संक्रांत : दोन महिन्यांत तपासणी

नाशिक : जिल्ह्यातील रेशन दुकानांची उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांमार्फत सुरू असलेली तपासणी मोहीम यापुढे कायमस्वरूपी राबविण्यात येणार असून, दर दोन महिन्यांनी अचानक तपासणी करून रेशन दुकानांची वर्गवारी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. सध्या सुरू असलेल्या तपासणीत ४७ दुकाने दोषी आढळले असून, त्यात एकट्या सुरगाणा तालुक्यातील २७ दुकानांचा समावेश आहे. ही सर्व दोषी दुकाने रद्द करण्यात येऊन त्या दुकानांशी संलग्न असलेल्या शिधापत्रिकाधारकांना पर्यायी रेशन दुकानात जोडण्यात येणार असल्याचे कुशवाह यांनी सांगितले. यापुढे दर दोन महिन्यांतून उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यामार्फत अचानक रेशन दुकानांची तपासणी करण्यात येणार असून, प्रत्येक दुकानाची तपासणी करून ‘अबकड’ अशी वर्गवारी करण्याचे ठरविण्यात आले आहे. कोणत्याही दोषमुक्त दुकानाला ‘अ’ दर्जा तर किरकोळ दोषी असलेल्यांना ‘ब’ दर्जा देण्यात येणार आहे. गंभीर स्वरूपांना ‘क’ तर अति गंभीर दुकानांना ‘ड’ दर्जात वर्ग करण्यात येऊन ते थेट रद्द करण्यात येणार आहे. दर दोन महिन्यांनी केल्या जाणाऱ्या तपासणीत या दुकानांच्या वर्गवारीचाही आढावा घेण्यात येऊन त्यांच्यात सुधारणा न झाल्यास व पुन्हा दोष आढळल्यास खालच्या दर्जात त्याची वर्गवारी करण्यात येईल तर उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा दर्जाही वाढविण्यात येणार आहे. या वर्गवारीच्या प्रक्रियेमुळे रेशन दुकानदारांना सुधारण्याची संधी मिळणार असल्याचे कुशवाह यांनी सांगितले.