शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
4
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
5
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
6
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
7
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
8
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
9
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
10
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
11
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
12
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
13
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
14
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
15
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
17
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
18
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
19
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
20
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...

रेशन दुकानदार संपाच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 23:30 IST

नाशिक : कोरोनाच्या कालावधीत कार्डधारकांना धान्य वाटपाची जबाबदारी पार पाडणाऱ्या रेशन दुकानधारकांना विमा संरक्षण देण्याचे जाहीर करूनही त्याबाबत अद्याप काहीही हालचाली होत नसल्याने रेशन दुकानदारांच्या आॅल महाराष्ट्र रेशनिंग शॉपकिपर्स फेडरेशन या राज्य संघटनेने १ जूनपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

नाशिक : कोरोनाच्या कालावधीत कार्डधारकांना धान्य वाटपाची जबाबदारी पार पाडणाऱ्या रेशन दुकानधारकांना विमा संरक्षण देण्याचे जाहीर करूनही त्याबाबत अद्याप काहीही हालचाली होत नसल्याने रेशन दुकानदारांच्या आॅल महाराष्ट्र रेशनिंग शॉपकिपर्स फेडरेशन या राज्य संघटनेने १ जूनपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.संघटनेने म्हटले आहे की, कोरोनाच्या कालावधीत अत्यावश्यक सेवेतील अनेक कर्मचारी, अधिकारी सेवा बजावत असताना त्यांना शासनाच्या सवलती आणि लाभही मिळत आहे. कोरोनामध्ये अन्नधान्य वाटपाची राज्याची महत्त्वाची मोहीम असून, त्यासाठी रेशन दुकानदार शासनाच्या आदेशाचे पालन करीत आहेत. मात्र त्यांना कोणतेही संरक्षण देण्यात आलेले नाही.कोरोना कालावधीत रेशन दुकानदारही जिवावर उदार होऊन गोरगरीब कार्डधारकांना धान्याचे वितरण करत असून, त्यांना विमा संरक्षण देण्याबाबत महिनाभरापूर्वीच शासनाने आश्वासित केले होते, परंतु अद्यापही त्याची अंमलबजावणी झालीच नाही.शासन मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याची खंत व्यक्त करत मागणी पूर्ण न केल्यास संप अटळ असल्याचे राज्याचे अध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर यांनी निवेदनात म्हटले आहे.गेल्या २ एप्रिल रोजी अन्न नागरी पुरवठा मंत्री भुजबळ आणि सचिवांनाही पत्र दिले होते. दि. २८ एप्रिलला शासनाने परिपत्रक काढून प्रस्ताव वित्त विभागाकडे दिला आहे. परंतु अद्यापही वित्त विभागाकडून तो प्रस्ताव मंजूर झाला नाही. त्यामुळे संघटनेने विमा संरक्षण लागू न झाल्यास १ जूनपासून रेशनिंगच्या मालाची उचल, वितरण बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे राज्याचे अध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर, उपाध्यक्ष निवृत्ती कापसे, विभागीय अध्यक्ष गणपत डोळसे पाटील यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.----------------------------शासनाने सर्व रेशन दुकानदार आणि दुकानांतील कामगारांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेतला. परंतु अत्यंत महत्त्वाचे म्हणजे अत्यावश्यक सेवेत काम करणाºया सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण लागू केले आहे. रेशनिंग दुकानदारांनीही विमा संरक्षणाची मागणी केली होती.

 

टॅग्स :Nashikनाशिक