शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
9
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
10
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
11
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
12
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
13
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
14
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
15
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
16
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
17
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
18
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

रेशनदुकानातील जून महिन्याचे वेळापत्रक निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 00:23 IST

रास्तभाव दुकानात एकाच वेळी नागरिकांची गर्दी होऊ नये, यासाठी जून महिन्याच्या धान्य वितरणाचे वेळापत्रक निश्चित करून धान्य वितरणाचे काम केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी रास्तभाव दुकानात गर्दी न करता व सुरक्षित अंतर ठेवून धान्य खरेदी करावे, असे आवाहन धान्य वितरण अधिकारी यांनी केले आहे.

नाशिक : रास्तभाव दुकानात एकाच वेळी नागरिकांची गर्दी होऊ नये, यासाठी जून महिन्याच्या धान्य वितरणाचे वेळापत्रक निश्चित करून धान्य वितरणाचे काम केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी रास्तभाव दुकानात गर्दी न करता व सुरक्षित अंतर ठेवून धान्य खरेदी करावे, असे आवाहन धान्य वितरण अधिकारी यांनी केले आहे.धान्य वितरण अधिकारी यांच्याकडून जून या महिन्याचे धान्य कशाप्रकारे वितरित करणार, याबाबत दुकानदारांना कळविण्यात आले आहे. त्यानुसार केशरी कार्डधारकांना वितरण कालावधी हा १ ते १० जून असा राहणार आहे. अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना वितरण कालावधी हा ११ ते २० जून असा राहणार आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (अंत्योदय व प्राधान्य कुटुंब)धारकांना मोफत वितरीत वितरण कालावधी हा २१ ते ३० जून असा राहणार आहे. तर केशरी, अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील राहिलेले कार्डधारकांनी २१ ते ३० जून या कालावधीत रास्तभाव दुकानदारांकडून नियामनुसार धान्य प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे एपीएल (केशरी) कार्डधारकांनी त्यांची शिधापत्रिका ज्या रास्तभाव दुकानास जोडण्यात आलेली आहे.खबरदारी घेण्याच्या सूचनाएपीएल (केशरी) कार्डधारकांना धान्य दिल्यानंतर धान्य दिल्याची पोहोच म्हणून शिधापत्रिकेच्या शेवटच्या पृष्ठावर माहे जूनचे अन्नधान्य दिले असा शिक्का रास्तधान्य दुकानदारांनी मारावा, शिधापत्रिकाधारक यांनी स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेतेवेळेस एकाच वेळेस गदी करू नये, शिधापत्रिकाधारक यांनी कुटुंबातील एकाच सदस्याला धान्य घेण्यासाठी स्वस्तधान्य दुकानात पाठवावे, शिधापत्रिकाधारक यांनी धान्य घेतेवेळेस चेहऱ्याला मास्क किंवा रुमाल लावून स्वस्तधान्य दुकानात जावे, अशा सूचना करतानाच रास्तभाव दुकानदार यांनी धान्य कमी देणे, जादा रकमेची आकारणी करणे, धान्य खरेदीची पावती न देणे आदी बाबतीत नागरिकांच्या तक्रारी असल्यास, त्यांनी धान्य वितरण अधिकारी यांना कळविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार