लासलगाव : ह्यहरे रामा हरे कृष्णाह्णच्या जय घोषात आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ इस्कॉनच्या वतीने काढण्यात आलेल्या रथयात्रेमध्ये भाविकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेला लासलगाव येथील बँक ऑफ बडोदा स्टेशन रोड येथून सुरुवात झाली.श्री भगवान जगन्नाथाची आरती करण्यात आली. त्यानंतर भाविकांनी रथ ओढत रथयात्रेला सुरुवात केली. रथयात्रेच्या मार्गावर रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. फटाक्यांची आतषबाजी आणि पुष्पवृष्टी करण्यात आली. स्टेशन रोडपासून सुरू झालेली रथयात्रेची सांगता लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डात झाली. यानंतर बाजार समितीच्या आवारात प्रवचन होऊन महाआरती संपन्न झाली. श्री जगन्नाथ रथयात्रेनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जगन्नाथाच्या दर्शनाचा लाभ घेतला. कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून रथयात्रा रद्द झाली होती. त्यामुळे कोरोना नंतर प्रथमच रथयात्रा निघाल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
लासलगावी भगवान जगन्नाथांची रथयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2022 23:20 IST
लासलगाव : ह्यहरे रामा हरे कृष्णाह्णच्या जय घोषात आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ इस्कॉनच्या वतीने काढण्यात आलेल्या रथयात्रेमध्ये भाविकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.
लासलगावी भगवान जगन्नाथांची रथयात्रा
ठळक मुद्दे स्टेशन रोडपासून सुरू झालेली रथयात्रेची सांगता लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डात