शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात रसिका शिंदे अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 02:34 IST

नाशिक : दहावीच्या निकालातही मुलींचेच वर्चस्व दिसून आले असून, नाशिक विभागातून ९०.२८ टक्के मुली तर ८५.१६ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातही उत्तीर्ण मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण अधिक आहे. नाशिकमध्ये ९१.४३ टक्के मुली, तर ८५.९६ टक्के च मुले उत्तीर्ण झाले आहेत. नाशिक विभागातून एकूण २ लाख ५४ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १ लाख ७४ हजार ८९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, विभागाचा निकाल ८७.४२ टक्के लागला आहे. नाशिकमध्ये रसिका शिंदे हिने शंभर पैकी शंभर टक्के गुण मिळवले असून, ती जिल्ह्यात पहिली आली आहे.

ठळक मुद्देदहावीच्या निकालातही मुलींचेच वर्चस्व

नाशिक : दहावीच्या निकालातही मुलींचेच वर्चस्व दिसून आले असून, नाशिक विभागातून ९०.२८ टक्के मुली तर ८५.१६ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातही उत्तीर्ण मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण अधिक आहे. नाशिकमध्ये ९१.४३ टक्के मुली, तर ८५.९६ टक्के च मुले उत्तीर्ण झाले आहेत. नाशिक विभागातून एकूण २ लाख ५४ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १ लाख ७४ हजार ८९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, विभागाचा निकाल ८७.४२ टक्के लागला आहे. नाशिकमध्ये रसिका शिंदे हिने शंभर पैकी शंभर टक्के गुण मिळवले असून, ती जिल्ह्यात पहिली आली आहे. नाशिक विभागात नाशिक जिल्ह्णात सर्वाधिक निकाल लागला असून, जिल्ह्णातील परीक्षेला प्रविष्ट ९० हजार २८३ विद्यार्थ्यांपैकी ८९ हजार ८७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यात मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८५.९६ व मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९१.४३ टक्के आहे. विभागातील धुळे जिल्ह्णात ६३ परीक्षा केंद्रांवर २९ हजार ९८ विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षेत ८७.५१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यात ८५.५१ टक्के मुले व ९०.१९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.जळगावमध्ये १३१ परीक्षा केंद्रांवर ६० हजार २४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी मुलांमध्ये ८५.७८ टक्के तर मुलींमध्ये ९१.२९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नंदुरबारमध्ये ४३ परीक्षा केंद्रांवर २० हजार ४३१ विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षेत मुलांमध्ये ७९.०६ व मुलींमध्ये ८२.७७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. थोडक्यात, दहावीच्या परीक्षेत पुन्हा एकदा मुलींनीच आपले वर्चस्व सिद्ध केले असून, मुलांच्या तुलनेत विद्यार्थिनीच टॉपर ठरल्या आहेत. राज्याचा एकूण निकाल ८९.४१ टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजेच ९६.१८ टक्के तर नाशिक विभागाचा निकाल ८७.४२ टक्के लागला आहे. मागील पाच वर्षांच्या तुलनेत निकालाची टक्केवारी कमी होत चालली असली तरी यावर्षी विभागात नाशिक जिल्ह्णाचा निकाल अव्वल राहिला असून, नंदुरबारचा निकाल मागील वर्षीप्रमाणे यंदाही सर्वात कमी लागला आहे. दरम्यान, जुलै २०१८विभागात नाशिक प्रथमधुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्णांमध्ये नाशिकचा निकाल सर्वाधिक ८८.४७ टक्के लागला असून, धुळे ८७ टक्के, जळगाव ८८.०८ टक्के व नंदुरबारचा निकाल ८०.७४ टक्के लागला आहे. मध्ये होणाऱ्या पुनर्परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांना आॅनलाइन पद्धतीने आवेदनपत्रे भरावयाची असून, त्यासाठी लवकरच वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याचे नाशिक विभागीय शिक्षण मंडळाचे प्रभारी अध्यक्ष रामचंद्र जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :educationशैक्षणिकSSC Results 2018दहावी निकाल २०१८