शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे येवल्यात विजयादशमीचे सघोष संचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 21:41 IST

येवला : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजयादशमी निमित्त येवला शहरातून संचलन झाले. शस्त्रपूजन उत्सव होवून उत्सव संपन्न झाला.

ठळक मुद्देशहरात ठिकठिकाणी स्वयंसेवकांचे स्वागत

येवला : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजयादशमी निमित्त येवला शहरातून संचलन झाले. शस्त्रपूजन उत्सव होवून उत्सव संपन्न झाला.संघटीत सज्जन शक्तीचे दर्शन समाजाला व्हावे यासाठी दसऱ्याच्या मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते.या संचलनात स्वयंसेवक पूर्ण गणवेशात सहभागी झाले होते. प्रारंभी घोड्यावर भगवा ध्वज घवून बसलेला स्वयंसेवक व त्या पाठोपाठ सुमारे ३०० गणवेशधारी स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध संचलन शहरातील प्रमुख मार्गावरून तासभर संचलन केले. शहरात ठिकठिकाणी स्वयंसेवकांचे स्वागत केले. स्वागतासाठी शहरात रांगोळ्या काढल्या होत्या.त्यानंतर शहरातील मुरलीधर मंदिरात विजयादशमी उत्सव सुरु झाला. कार्यक्र मप्रसंगी पुणे येथील प्रांत प्रचारक यशोवर्धन वाळिंबे, तालुका संघचालक मुकुंदराव गंगापुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते डॉ. हेगडेवार यांच्या प्रतिमेचे व शस्त्रांचे पुजन करण्यात आले.यावेळी प्रताप दाभाडे यांनी सामुदाईक पद्य म्हटले. रविंद्र भावसार यांनी वैयक्तिक पद्य सादर केले. अमृत वचन यामधून प्रसाद भावसार यांनी मातृभूमीचे महत्व सांगितले. अथिती परिचय व आभार प्रदर्शन अनिल सूर्यवंशी यांनी केले. प्रमुख अतिथी यशोवर्धन वाळिंबे यांनी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना समाज व राष्ट्राच्या उन्नतीसाठी शक्तीची उपासना करणे आवश्यक असल्याचे सांगितले.याप्रसंगी बाळासाहेब कापसे, मयूर गुजराथी, दिनेश मुंदडा, विक्र म गायकवाड, श्रीपाद पटेल, सुनिल सस्कर, सुभाष सस्कर, विजय चंडालिया, अरविंद जोशी, डॉ. शैलेश भावसार, सुरेश शेटे, प्रताप दाभाडे, प्रदिप निकम, देविदास भांबारे, अतुल काथवटे, तरंग गुजराथी, भोला वाडेकर, आप्पा घाटकर, ज्ञानेश्वर बुटे, राम कुलकर्णी, आबा देशमुख, गोरख काळे, दिपक शेळके आदीसह स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघNashikनाशिक