सर्प म्हटला की, सर्वसामान्यांच्या अंगाला काटा येतो. सर्पाची भीती बहुसंख्य लोकांच्या मनात असते. सर्प दिसला की नागरिक सर्पमित्राची मदत घेण्याचा प्रयत्न करतात. शहरात काही वन्यजीवप्रेमी संस्थांचे वन्यजीवप्रेमी हे अत्यंत सुरक्षित व कायद्याचे तंतोतंत पालन करत लोकवस्तीतून सर्प रेस्क्यू करत त्या सर्पाच्या प्रजातीची स्थानिक वनविभागाच्या कार्यालयात नोंद करून वनरक्षकांच्या समक्ष नैसर्गिक अधिवासात सर्पाला मुक्त करतात; मात्र काही कथित सर्पमित्र याला अपवाद आहे. ही मंडळी सापाला रेस्क्यू केल्यानंतर चक्क आपल्या घरात प्लॅस्टिकच्या बरणीत ठेवणे पसंत करते, तर काही कथित सर्पमित्र (गुरू) साप पकडण्याचे ‘प्रशिक्षण’ इतरांना (शिष्य) देण्यासाठी चक्क एखाद्या मोकळ्या भूखंडावर त्या सापासोबत ‘खेळ’ करतानाही दिसून येत असल्याचे वन्यजीवप्रेमींनी सांगितले. कथित सर्पमित्रांना साप पकडण्यासाठी इतरांना ‘धडे’ देण्याची परवानगी नेमकी कोणी व कोठून दिली? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
---इन्फो---
सर्पमित्र नेमके कोण?
कथित सर्पमित्र अन् खरेखुरे प्रशिक्षित सर्पमित्र नेमके कोण हे ओळखणे आता नाशिककरांना अवघड झाले आहे. प्रशिक्षित व कायद्याचे पालन करत सर्पांना रेस्क्यू करून रीतसर त्याची वनविभागात नोंद करणाऱ्या सर्पमित्रांची अधिकृतपणे यादी जाहीर करण्याची मागणी होत आहे. तसेच कथित सर्पमित्रांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडसही वनविभागाने दाखविण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.
--इन्फो--
‘हॅन्डलर’ घालताहेत जीव धोक्यात
विविध प्रजातींचे सर्प हाताळत कथित सर्पमित्र (हॅन्डलर) स्वत:सह इतरांचाही जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्प पकडण्याचे धडे देण्याच्या नावाखाली ही मंडळी सर्रासपणे वन्यजीव कायद्याचे उल्लंघन करत असल्याची चर्चा आहे. शहरातील विविध उपनगरांमध्ये निर्जन भागात अशा प्रकारे हॅन्डलरकडून ‘खेळ’ केला जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. यामध्ये बहुतांश सर्पमित्र हे अशिक्षित व व्यसनाधीन असल्याचेही पुढे आले आहे.
---कोट---
सर्पमित्रांना वनविभागाकडे नोंद करणे बंधनकारक आहे. हॅन्डलिंगवर पूर्णपणे कायद्याने बंदी आहे. नैसर्गिक अधिवासात लोकवस्तीपासून लांब अशा भागात सापाला मुक्त करणे गरजेचे असते, त्यामुळे साप सुरक्षितरीत्या पकडल्यानंतर ते वनविभागाच्या कार्यालयात आणून देणे प्रत्येक सर्पमित्रावर बंधनकारक आहे. सापासोबत कुठल्याही प्रकारे जर कोणी स्टंट करत असेल किंवा छायाचित्र, व्हिडीओ व्हायरल करत असेल तर तो गुन्हा असून त्यांच्याविरुध्द कारवाई करण्यात येईल.
- विवेक भदाणे, वनपरिक्षेत्र अधिकारी
---
२८स्नेक/स्नेक१ नावाने फोटो आर वर सेव्ह
===Photopath===
280121\28nsk_25_28012021_13.jpg~280121\28nsk_26_28012021_13.jpg
===Caption===
फोटो स्टंटबाजी~फोटो स्टंटबाजी