शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

ममदापूर परिसरात वाडी-वस्तीवर तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:18 IST

येथे वाडी-वस्तीवर तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, गावातील टॅँकरची खेप वाढविण्याची मागणी होत आहे. ममदापूर ग्रामपंचायतीने जानेवारी महिन्यामध्ये मागणी केल्यावर मार्च महिन्यात पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकर सुरू करण्यात आला, परंतु सदर टॅँकरची क्षमता आठ हजार लिटरची असल्याने गावातील लोकांना जास्त पाणी मिळत नाही. परिणामी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

ममदापूर : येथे वाडी-वस्तीवर तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, गावातील टॅँकरची खेप वाढविण्याची मागणी होत आहे. ममदापूर ग्रामपंचायतीने जानेवारी महिन्यामध्ये मागणी केल्यावर मार्च महिन्यात पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकर सुरू करण्यात आला, परंतु सदर टॅँकरची क्षमता आठ हजार लिटरची असल्याने गावातील लोकांना जास्त पाणी मिळत नाही. परिणामी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.  वारंवार मागणी करूनदेखील अद्यापही टॅँकरची खेप वाढविण्यात आली नाही. तसेच बेंडके वस्ती, केरे वस्ती, गिडगे वस्ती खडकी या भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते आहे. तांडा वस्तीवर टॅँकर सुरू झाल्याने उसतोडी करून तांड्यावर परत आलेल्या ग्रामस्थांमध्ये खुशी असून, इतर वस्तीवरील शेतकरीवर्गाचा केव्हाही पिण्याच्या पाण्यासाठी उद्रेक होऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर्षी ममदापूर परिसरात कमी प्रमाणात पाऊस पडला, त्यामुळे गावातील कुठल्याही विहिरीत पाणी नाही. ग्रामपंचायत मालकीची विहीर कोरडी असल्याने जानेवारी महिन्यापासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.  वाडी-वस्तीकडे सगळ्या यंत्रणेचे लक्ष कमी असल्याने गावात पिण्याच्या पाण्यासाठी छोटा टॅँकर सुरू असून, बाहेरगावी उसतोडीसाठी गेलेले सर्व लोक गावात परतल्याने पिण्याच्या पाण्याची मोठी पंचाईत झाली आहे. ग्रामसेवक भगवान गायके यांनी गावातील पिण्याच्या पाण्यासाठी ठराव केला तेव्हा वाडी- वस्तीसाठीदेखील ठराव केला मग गाव आणि वस्ती असा भेदभाव कसा? गावातील लोकांना पाणी आहे मग वाडी-वस्तीवर पाण्याची काहीच गरज नाही का ? असा प्रश्न शेतकरीवर्गाला पडला आहे.  ममदापूर येथील ग्रामस्थांचा कायमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी या परिसरातील मेळाचा बंधारा होणं गरजेचं असून तो झाला तर परिसरातील पाच ते सहा गावांतील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होऊ शकते. ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक यांनी याबाबत लक्ष घालून उन्हाळ्याचे राहिलेले पंधरा ते वीस दिवस पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.साठवलेले पाणी झाले पिवळेशेतकरीवर्गाने आपल्या शेतातील विहिरीत जानेवारी महिन्यात साठवलेले पाणी सध्या पिवळ्या रंगाचे झाले असून, तेच पाणी पिण्याची वेळ आली आहे. वाडी-वस्तीकडे सगळ्यांचे दुर्लक्ष असून, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांना पिण्याच्या पाण्याच्या टॅँकरविषयी विचारले असता टॅँकर उद्या सुरू होईल असे सांगितले जाते. परिसरातील विहिरीना पाणी कमी असल्याने बऱ्याच ठिकाणांहून महिलांना रिकाम्या हाताने परत फिरावे लागत असल्याने सर्व स्तरातून प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईचा निषेध व्यक्त केला जात आहे. पंधरा दिवसांपूर्वी नाशिक येथील तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या पथकाने पाहणी करूनदेखील अद्याप वाडी-वस्तीवर टॅँकर चालू झालेला नाही.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई