शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अपहरण करून तब्बल सहा वर्षे बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 00:38 IST

नांदूरनाका परिसरात राहणाऱ्या मुलीच्या बारा वर्षीय मैत्रिणीस जेवणातून गुंगीचे पदार्थ खाऊ घालून तिचे अपहरण केल्यानंतर दिल्लीतील एका इसमाशी जबरदस्तीने विवाह लावून देण्यात आला़ त्यानंतर संशयित व त्याच्या भावाने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तब्बल सहा वर्षे या मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देआरोपींची टोळी : मैत्रिणीच्या आईचा समावेश

नाशिक : नांदूरनाका परिसरात राहणाऱ्या मुलीच्या बारा वर्षीय मैत्रिणीस जेवणातून गुंगीचे पदार्थ खाऊ घालून तिचे अपहरण केल्यानंतर दिल्लीतील एका इसमाशी जबरदस्तीने विवाह लावून देण्यात आला़ त्यानंतर संशयित व त्याच्या भावाने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तब्बल सहा वर्षे या मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलगी नाशिकला परतल्यानंतर याचा उलगडा झाला असून, या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात आठ संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित संगीता होंडे (रा़ विहितगाव, देवळाली कॅम्प) या महिलेला अटक करण्यात आली आहे़पीडित मुलीने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार २०१२ मध्ये ती आईसमवेत नांदूर नाका परिसरात राहत होती़ शेजारी राहणारी तिची मैत्रीण गौरी हिची आई संशयित नंदा जाधव हिने जेवणात गुंगीचे औषध खाऊ घातले व गुंगी आल्याचे लक्षात आल्यानंतर एका रिक्षात टाकून संशयित मंगला या महिलेकडे सोडून दिले. मंगलाने महिनाभर एका खोलीत कोंडून नंतर या मुलीस पूजा नावाच्या महिलेकडे पाठविले. तेथून संशयित संगीता, रंजना, राजू व संजय, विनोद यांच्यासोबत दिल्ली व उत्तर प्रदेशातील रतोडा गावी नेले़ या ठिकाणी संजयसोबत जबरदस्तीने लग्न लावून दिले़ यानंतर पीडित मुलीला संशयित संजयकडून प्रतिदिन मारहाण तसेच सन २०१२ ते २२ सप्टेंबर २०१८ या सहा वर्षांच्या कालावधीत बलात्कार केला. संजय, त्याचा भाऊ विनोद या दोघांनीही या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला असून, या मुलीने दोन मुलांनाही जन्म दिला आहे़पीडित मुलीने विवाह झालेल्या संशयित संजय यास रक्षाबंधनासाठी आईकडे जाण्याचा हट्ट धरला़ त्यानुसार त्याने देवळाली कॅम्प येथून खरेदी केलेल्या महिलेकडे पीडितेला आणले व एक दिवस मुक्कामही केला़ त्यानंतर पुन्हा परतीस निघाला असता पीडितेने मनमाड रेल्वेस्थानकावर धावत्या रेल्वेतून उतरून घेतल्याने २४ आॅगस्टला या मुलीला तिच्या आईकडे सोडून तो फरार झाला़ या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार नंदा जाधव, मंगला, पूजा, संगीता, रंजना, राजू, संजय व विनोद या आठ संशयितांविरोधात अपहरण, बलात्कार, लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पोलिसांची टाळाटाळपीडित मुलीच्या कुटुंबीयांनी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यासाठी धाव घेतली़ मात्र, संबंधित पोलीस कर्मचाºयांनी गुन्हा नोंदवून न घेता आपसात प्रकरण मिटविण्याचा सल्ला देत मुलीला व तिच्या नातेवाइकांनाच दमबाजी केली़ याबाबत अत्याचारविरोधी कृती समितीचे राहुल तुपलोंढे व कार्यकर्त्यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांची सोमवारी (दि़ १७) भेट घेत परिस्थिती समजावून सांगितली़ यानंतर आयुक्तांच्या आदेशानंतर आडगाव पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयRapeबलात्कार