शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

रानमेवा, ‘डोंगरची काळी मैना’च्या विक्रीतून उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 01:05 IST

शेती हा आदिवासी बांधवांचा प्रमुख व्यवसाय. मात्र हे चित्र आता बदलले असून, करवंद, जांभळं, आंबे व स्ट्रॉबेरी यांच्या विक्रीतून आदिवासी बांधवांनी उत्पन्नाचा पर्याय शोधला असून, विक्रीचे कौशल्यही त्यांनी आत्मसात केले आहे.

वणी : शेती हा आदिवासी बांधवांचा प्रमुख व्यवसाय. मात्र हे चित्र आता बदलले असून, करवंद, जांभळं, आंबे व स्ट्रॉबेरी यांच्या विक्रीतून आदिवासी बांधवांनी उत्पन्नाचा पर्याय शोधला असून, विक्रीचे कौशल्यही त्यांनी आत्मसात केले आहे.उदरनिर्वाहासाठी पिढ्यान्पिढ्या पारंपरिक पद्धतीने शेती व्यवसाय करणे हा आदिवासी बांधवांचा आवडता व्यवसाय. प्रामाणिकपणा, कष्टकरी वृत्ती ही त्यांची वैशिष्ट्ये. मात्र जसजसा काळ बदलत गेला तसतसा शेती व्यवसायाबरोबर पर्यायी उत्पन्नाची संकल्पना त्यांच्या मनात रुजू लागली. प्रगत तंत्रज्ञान व नवनवीन क्षेत्रातील रोजगाराच्या वाढत्या संधी यांनीही त्यांच्या सद्यस्थितीतील पिढ्यांना प्रेरित केले. दरम्यान, या सर्व बाबींचा लेखाजोखा बघितला तर आदिवासी बांधवांची नाळ निसर्गाशी जोडल्याने नैसर्गिक पद्धतीने उत्पादित रानमेव्याच्याविक्र ीतून आर्थिक वृद्धीस हातभार लागला आहे. वणी-कळवण रस्त्यावरील अहिवंतवाडी परिसरात आदिवासी बांधव रस्त्याच्या कडेला करवंद, जांभळे, गावठी आंबे विक्रीसाठी घेऊन बसतात. दरेगाव व बिलवाडी व सप्तशृंगगडाच्या पायथ्याच्या परिसरातही त्यांनी दुकाने थाटली आहेत.बिलवाडी परिसरात तर शेकडोंच्या संख्येने आंब्याची झाडे आहेत, तर डोंगराळ भागात व दरी-खोऱ्याच्या परिसरात करवंद व जांभळांची झाडे मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती सोमनाथ गवळी यांनी दिली. या मार्गावरून गडावर जाणारे पर्यटक परिसरातील नैसर्गिक चवीचा आस्वाद देणारी फळे खरेदी करतात. त्या माध्यमातून चार पैसे आदिवासी बांधवांना मिळत आहे.दरम्यान, वणी-सापुतारा मार्गावर स्ट्रॉबेरीसह जांभळे, करवंद या फळांची विक्री होताना दिसत आहे. खासगी वाहने, आरामदायी बसमधील प्रवासी हे त्यांचे खरेदीदार आहेत. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आदिवासी महिला लहान मुले फळांची विक्री करून दोन पैसे कमावताना दिसत आहे.

टॅग्स :NashikनाशिकMONEYपैसा