पेठ : तालुक्यातील कोटंवीच्या ग्रामपंचायतीवर शिवसेनेने सत्ता स्थापन केली. २५ वर्षांपासून विरोधकांच्या ताब्यात असलेल्या कोटंबी ग्रामपंचायतीवर शिवसेनेने भगवा फडकावला असून, सरपंचपदी सेनेच्या रंजना वामन भुसारे, तर उपसरपंचपदी सेनेचेच किरण पुंडलिक भुसारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निवडणूक निर्णय अधिकारी चौधरी यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष सभेत सरपंचपदासाठी रंजना भुसारे, तर उपसरंपचपदासाठी किरण भुसारे यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची विनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी सदस्य पंढरीनाथ वाघमारे, मनीषा भुसारे, शोभा भुसारे, देवता चौधरी, घनशाम चौधरी, ग्रामसेवक पाडवी, तलाठी भालेराव, किसन गावित, शशिकांत भुसारे, धनाजी भुसारे, यशवंत वाघमारे, मधुकर भुसारे, गोपाळ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)
कोटंबीच्या सरपंचपदी रंजना भुसारे
By admin | Updated: July 14, 2016 00:42 IST