शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

राष्टवादीच्या शहराध्यक्षपदी रंजन ठाकरे यांची फेरनियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 00:51 IST

गेल्या पाच महिन्यांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या शहर राष्टÑवादी कॉँग्रेसच्या अध्यक्षपदी रंजन ठाकरे यांची फेरनियुक्ती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केल्याने यासंदर्भात होत असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून, अखेर पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी ठाकरे यांच्या पारड्यातच आपला कौल दिला आहे.

नाशिक : गेल्या पाच महिन्यांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या शहर राष्टÑवादी कॉँग्रेसच्या अध्यक्षपदी रंजन ठाकरे यांची फेरनियुक्ती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केल्याने यासंदर्भात होत असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून, अखेर पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी ठाकरे यांच्या पारड्यातच आपला कौल दिला आहे.  राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुका होऊन पाच महिन्यांचा कालावधी उलटूनही पक्षश्रेष्ठींकडून नाशिक शहर अध्यक्षपदाचे नाव घोषित केले जात नव्हते. या पदासाठी अनेक इच्छुक असल्याचे सांगितले जात असले तरी, प्रत्यक्षात पक्षांतर्गत निवडणुकीत शहरातील ब्लॉक अध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून प्रदेश अध्यक्षांकडे रंजन ठाकरे यांच्या एकमेव नावाची शिफारस करण्यात आली होती. याउपरही प्रदेशाध्यक्षांना सर्व अधिकार देण्याचा ठरावही पाठविण्यात आला होता. पक्षांतर्गत या सर्व घडामोडी होत असतानाच जिल्ह्याचे नेते छगन भुजबळ यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर पक्षाची सारी सूत्रे भुजबळ यांच्याकडेच सोपविण्यात आली. त्यामुळे नवीन जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्षांच्या नेमणुकीत भुजबळ यांचा हस्तक्षेप व सामाजिक, भौगोलिक रचनेनुसार नियुक्त्या करण्यात आल्या. परंतु नाशिक शहराध्यक्ष जाहीर केले जात नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. पक्षाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी, ठाकरे यांनी पक्षाचे कार्य सुरूच ठेवल्याने अखेर त्यांना कौल देण्यात आला आहे.दुस-यांदा अध्यक्षपदाची जबाबदारीमंगळवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रंजन ठाकरे यांची नाशिक शहर-जिल्हाध्यक्षपदावर नियुक्ती केल्याचे पत्र पाठविले आहे. दोन वर्षांपूर्वी पक्षाची सैरभैर अवस्था असताना ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे यांच्यावर पक्षाने अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली होती. आता पुन्हा दुसºयांदा शहराध्यक्ष होण्याची संधी दिवंगत डॉ. वसंत पवार यांच्यानंतर रंजन ठाकरे यांना मिळाली आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसChagan Bhujbalछगन भुजबळ