शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

रानी नाचे मोर, कृष्णपिसे थोर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 00:49 IST

गीतेसारखं भलमोठं तत्त्वज्ञान सांगणारा, आपल्या उपस्थितीनेही पांडवांच्या पक्षात विजय आणणारा , प्रेमाचे प्रतीक असलेला कृष्ण हे एक अजब रसायन आहे. त्याचे देवत्व, असामान्यत्व अनेक लीलांमधून समोर येते

नाशिक : गीतेसारखं भलमोठं तत्त्वज्ञान सांगणारा, आपल्या उपस्थितीनेही पांडवांच्या पक्षात विजय आणणारा , प्रेमाचे प्रतीक असलेला कृष्ण हे एक अजब रसायन आहे. त्याचे देवत्व, असामान्यत्व अनेक लीलांमधून समोर येते. कवी आणि गीतकार प्रशांत भरवीरकर यांचे शब्द आणि बासरीवादक मोहन उपासनी यांनी या शब्दांना चढविलेले सुरांचे कोंदण यामुळे गोकुळअष्टमीच्या दिवशी काळजाला मोरपीस स्पर्शून जाणारी मैफल नाशिककरांनी अनुभवली.  कापड बाजारातील श्री व्यंकटेश बालाजी संस्थान आणि वेणुनाद या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ‘शब्द सूर संवाद’ या मालिकेतील चौथे पुष्प ‘कृष्णार्पण’ या मैफलीच्या माध्यमातून गुंफले गेले. ‘राधाबाई आली चाहूल’ या गीताने मैफलीस प्रारंभ झाला. ‘कोठे धाव अंतरीची’, ‘राधेच्या पायी गं’, ‘वेड्यावानी झाले सारे’, ‘अलगद येई सांज’, ‘देह झाला स्वर जेव्हा’, ‘रानी नाचे मोर,कृष्णपिसे थोर’, ‘स्वर येई कुठूनसा’, ‘कान्ह्युल्याची वेडी माया’, ‘परतुनी ये रे कृष्णा’ या गीतांनी उपस्थितांना कृष्णदर्शन घडविले. ‘का लपविशी कंचुकी चुनरी’ ही गवळणही मैफलीची उंची वाढविणारी ठरली. मोहन उपासनी यांची लवकरच यु ट्यूबवर प्रदर्शित होणारी आणि दाक्षिणात्य संगिताची अनूभुती देणारी ‘डोईवर घागर’ ही गवळणही ऐकविण्यात आली. मैफलीचे निरुपण प्रा. डॉ. राहुल पाटील यांनी केले. पुष्कराज भागवत, स्वागता पोतनीस आणि पूर्वा क्षिरसागर यांनी कृष्णगीते सादर केली. संगीत साथ मोहन उपासनी (बासरी), अनिल धुमाळ (सिंथेसायझर), शुभम जाधव (आॅक्टोपॅड), सतीश पेंडसे (तबला) यांनी केली. पराग जोशी यांनी ध्वनीव्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली.यावेळी मेधा उपासनी यांनी मोहन उपासनी यांना स्वत: चितारलेले श्रीकृष्णाचे चित्र भेट दिले. प्रारंभी संस्थानच्या वैशाली बालाजीवाले यांनी कलावंतांसह उपस्थितांचे स्वागत केले. कवी किशोर पाठक, सी.एल. कुलकर्णी व मिलिंद गांधी यांच्या हस्ते कलावंतांचा सत्कार करण्यात आला.झुल्यावर बाळकृष्णश्री व्यंकटेश बालाजी संस्थानच्या मंदिरात गोकुळअष्टमी साजरी करण्यात आली. यावेळी झुल्यावर बाळकृष्णाची मोहक मूर्ती ठेवण्यात आली होती. या मूर्तीचे पूजन पुण्याच्या लक्ष्मी फडणीस, मेधा उपासनी आणि ऐश्वर्या बालाजीवाले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी ‘गोविंदा गोविंदा’चा गजर करत श्रीकृष्णाला वंदन केले.

टॅग्स :Dahi Handiदही हंडीNashikनाशिक