शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' क्रूर अमानवी घटनेचा रांगोळीतून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 17:16 IST

नाशिक : केरळमधील हत्तीणीला फटाक्यांनी भरलेला अननस खाऊ घालून तिची अत्यंत क्रुरपणे हत्या केल्याच्या घटनेचा देशभर निषेध आणि संतापही ...

ठळक मुद्देसहा तासांत ४८ फुटांची रांगोळीहत्तीणीच्या हत्येचा शोकसंतप्त धिक्कार

नाशिक : केरळमधील हत्तीणीला फटाक्यांनी भरलेला अननस खाऊ घालून तिची अत्यंत क्रुरपणे हत्या केल्याच्या घटनेचा देशभर निषेध आणि संतापही व्यक्त केला जात आहे. या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेने अवघा देश थरथरला. सोशल मिडियावर नेते, अभिनेत्यांपासून सर्वसामान्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. अशाच पद्धतीने नाशिकची युवा रांगोळीकार पूजा बेलोकर व तिच्या सहकाऱ्यांनी सहा तास अविरत परिश्रम घेत ६ फूट रुंद व ८ फूट लांबीची रांगोळी रेखाटून या अमानवी कृत्याचा निषेध नोंदविला.नाशिकमधील रविवार कारंजा येथील लोणार गल्लीत पूजा, ओमकार टिळे यांनी या क्रूर घटनेकडे आपल्या रांगोळीच्या कलेद्वारे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. हत्तीणीचे चित्र रेखाटून ‘एका मुक्या आईच्या आक्रोशाचा न्याय जेव्हा निसर्ग करेल, तेव्हा तुमच्या गर्वाची मस्ती जिरवल्याशिवाय राहणार नाही...’ असा संतापजनक संदेशही रांगोळीद्वारे दिला आहे. ४८ चौरस फुटाची रांगोळी काढण्यासाठी पूजा आणि ओमकारला सुमारे सहा तासांचा वेळ लागला. या रांगोळीचे शिर्षक त्यांनी ‘अमानवी घटना’ असे दिले आहे.केरळमध्ये हत्तीणीचा अशा पद्धतीने ‘खून’ करण्यात आला. पर्यावरण दिनाच्या तोंडावर ही संतापजनक क्रूर घटना समोर आली आणि अवघा देश हादरला. सोशल मीडिया गहिवरून आला. सर्वच क्षेत्रांमधून या घटनेचा अत्यंत तीव्र अशा शब्दांत निषेध नोंदविला गेला. सर्वांनी या क्रूरतेला माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य म्हटले. ज्यांनी हे कृत्य केले त्यांना भारतीय वन्यजीव संवर्धन कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी, अशी जोरदार मागणी सर्वच स्तरांमधून पुढे आली. केवळ पर्यावरणप्रेमी, निसर्ग व वन्यजीवप्रेमी नव्हेच तर प्रत्येक संवेदनशील मन या घटनेने हळहळले. ज्या निसर्गाने केरळला भरभरून दिले, त्या राज्यातील एका गावात अशी घटना घडणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

टॅग्स :Nashikनाशिकrangoliरांगोळी