शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

पंचवटी प्रभाग सभापतिपदी मनसेचे रुची कुंभारकर बिनविरोध

By admin | Updated: April 14, 2016 00:13 IST

निवड : आमदार सानपांसह भाजपाच्या खोडे गैरहजर

 पंचवटी : पंचवटी प्रभाग समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपा, अपक्ष व कॉँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने नगरसेवक रुची कुंभारकर यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दरम्यान पंचवार्षिक निवडणुकीच्या शेवटच्या वर्षात काहीतरी नाट्यमय घडामोडी घडतील अशी शक्यता वर्तविली जात होती; मात्र कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, मनसे व अपक्ष यांनी महाआघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहण्याचे एकमत केल्याने विरोधकांना कोणतीही राजकीय खेळी करता आली नाही. पंचवटी विभागीय कार्यालयात दुपारी साडेबारा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. प्रभाग सभापतीसाठी मनसेकडून कुंभारकर, भाजपाकडून प्रा. परशराम वाघेरे, अपक्ष दामोदर मानकर, तर कॉँग्रेसकडून विमल पाटील यांनी अर्ज सादर केले होते. अर्ज माघारीच्या वेळेपूर्वीच वाघेरे व मानकर यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे माघारी अर्ज दिले; मात्र दिलेल्या वेळेत अर्ज माघारी घेतले जातील असे सुचविल्याने वेळ सुरू होताच तिघाही उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. सभापतिपदासाठी कुंभारकर यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कुंभारकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. यावेळी महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरमित बग्गा, अ‍ॅड. राहुल ढिकले, उद्धव निमसे, गणेश चव्हाण, डॉ. विशाल घोलप, समाधान जाधव, सुनीता निमसे, मीना माळोदे, कविता कर्डक, रूपाली गावंड, सुनीता शिंदे, लता टिळे, ज्योती गांगुर्डे, फुलावती बोडके, रंजना भानसी, शालिनी पवार हे सदस्य उपस्थित होते. शिवसेनेच्या मनीषा हेकरे यांनी सभागृहात हजेरी लावली; मात्र काही वेळातच त्यांनी सभागृहाबाहेर काढता पाय घेतला. तर भाजपा आमदार बाळासाहेब सानप व सिंधू खोडे हे दोघेही गैरहजर होते. भाजपा तसेच शिवसेना यांनी महाआघाडी विरोधात लढा देण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी वाघेरे तसेच अपक्ष मानकर यांच्या माध्यमातून उमेदवारदेखील उभे केले; मात्र संख्याबळ कमी असल्याने सेना भाजपाचे मनसुबे उधळले गेले. सभापतिपदी कुंभारकर यांची निवड होताच उपस्थित सदस्यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले. (वार्ताहर)