शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

तपोवनातील ‘रामसृष्टी’ हरविली गाजरगवातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2019 7:51 PM

नाशिक : तपोवनात येणाऱ्या हजारो भाविक पर्यटकांना सहकुटुंब वृक्षराजीच्या सान्निध्यात बसून निवांत क्षण घालवता यावे तसेच बालगोपाळांना आनंदाने बागडता ...

ठळक मुद्देगरज आहे ती राजकीय व प्रशासकीय इच्छाशक्तीची. संपूर्ण ‘रामसृष्टी’ गाजरगवत अन् अस्वच्छतेच्या विळख्यात

नाशिक : तपोवनात येणाऱ्या हजारो भाविक पर्यटकांना सहकुटुंब वृक्षराजीच्या सान्निध्यात बसून निवांत क्षण घालवता यावे तसेच बालगोपाळांना आनंदाने बागडता यावे आणि वनभोजनाचा आनंद लुटता यावा, या उद्देशाने ‘रामसृष्टी’ साकारली गेली; मात्र नव्याचे नऊ दिवस लोटल्यानंतर तपोभूमीतील ‘रामसृष्टी’च्या नशिबी वनवास आला तो कायमचाच.लाखो रुपये खर्च करून महापालिकेने काही वर्षांपूर्वी जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेअंतर्गत तपोवनात रामसृष्टी उद्यान साकारले. मात्र सध्या या उद्यानाची रया गेली असून, संपूर्ण ‘रामसृष्टी’ गाजरगवत अन् अस्वच्छतेच्या विळख्यात सापडली आहे. रामसृष्टीचा आनंद घेण्यापासून पर्यटक वंचित आहेत. भव्य-दिव्य जागेत साकारलेल्या या उद्यानाची दुरवस्था देखभाल दुरुस्तीअभावी झाली आहे. उद्यानाच्या जागेचा वापर सकारात्मक व विकासाच्या दृष्टिकोनातून उत्तमरीत्या करता येऊ शकेल. गरज आहे ती राजकीय व प्रशासकीय इच्छाशक्तीची.रामायण सर्किट या केंद्र शासनाच्या योजनेत नाशिकचा समावेश झाला असल्यामुळे रामसृष्टी उद्यानात भविष्यात ‘रामायण’शी संबंधित आगळावेगळा असा प्रकल्पदेखील साकारणे शक्य आहे. मात्र तत्पूर्वी रामसृष्टी उद्यानाला गतवैभव प्राप्त करून देण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. रामसृष्टी उद्यानाची दुरवस्था रोखणे गरजेचे असून, उद्यानात पर्यटकांना बसण्यासाठी तुटपुंज्या बाकांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. तसेच आकर्षक पॅगोड्यांची दुरवस्था थांबवून आकर्षक रंगरंगोटीची मागणी नागरिकांनी केली आहे. उद्यानातील नशेबाजांचा उपद्रव थांबविणे आवश्यक आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाTapovanतपोवनgodavariगोदावरी