शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
Manoj Jarange Patil Morcha Live: मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल; हजारो आंदोलकांसोबत मनोज जरांगे आझाद मैदानाकडे
3
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
4
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
5
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
6
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
7
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
8
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
9
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
10
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
11
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
12
अमेरिकने कितीही दम दिला, तरी उत्पादनात भारताची झेप
13
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
14
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
15
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
16
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
17
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
18
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
19
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
20
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात

‘रामलल्ला हम आयेंगे...’गजर : पंचमुखी हनुमान मंदिरात ध्वजपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 01:22 IST

पंचवटी : ‘धर्म की जय हो, अधर्म का नाश हो,’ ‘रामलल्ला हम आयेंगे ,’ ‘जय सिता राम सिता’ असा जयघोष करत अयोध्या येथे उभारण्यात येणाऱ्या राममंदिर भूमिपूजन पार्श्वभूमीवर पंचवटीतील जुना आडगाव नाक्यावरील पंचमुखी हनुमान मंदिरात नाशिक धर्मसभा, विश्व हिंदू परिषद, हिंदू एकता आंदोलन, पुरोहित संघ व साधू-महंतांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि.४) सकाळी सामूहिक रामरक्षा, हनुमान चालिसा पठण करण्यात आली.

ठळक मुद्देश्रीफळ वाढवून येऊन यावेळी ध्वजपूजन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : ‘धर्म की जय हो, अधर्म का नाश हो,’ ‘रामलल्ला हम आयेंगे ,’ ‘जय सिता राम सिता’ असा जयघोष करत अयोध्या येथे उभारण्यात येणाऱ्या राममंदिर भूमिपूजन पार्श्वभूमीवर पंचवटीतील जुना आडगाव नाक्यावरील पंचमुखी हनुमान मंदिरात नाशिक धर्मसभा, विश्व हिंदू परिषद, हिंदू एकता आंदोलन, पुरोहित संघ व साधू-महंतांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि.४) सकाळी सामूहिक रामरक्षा, हनुमान चालिसा पठण करण्यात आली. भूमिपूजन सोहळा आणि मंदिर उभारणी काम निर्विघ्न पार पडावे यासाठी श्रीफळ वाढवून येऊन यावेळी ध्वजपूजन करण्यात आले.अयोध्या येथे उभारण्यात येणाºया राममंदिर भूमिपूजन सोहळा बुधवारी (दि.५) होत असून, त्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये असलेल्या विविध देवदेवतांच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ करण्यात आला. श्रीराम वनवासात गेले होते. त्यावेळी त्यांचे नाशिकला काहीकाळ वास्तव्य होते. त्यामुळे नाशिक पुण्यभूमी बनली आहे. सध्या देशभरात कोरोना सावट असल्याने साधू-महंत व भाविकांना अयोध्येत भूमिपूजन सोहळ्यात सहभागी होता येणार नाही म्हणून आहे त्याठिकाणी रामनामाचा गजर करत भूमिपूजन सोहळा साजरा केला जात आहे. मंगळवारी सकाळी पंचमुखी हनुमान मंदिरात साधू-महंतांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीराम, हनुमान मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर टाळ-मृदुंगांच्या गजरात भजन कीर्तन कार्यक्रम झाला. यावेळी उपस्थित साधू-महंतांनी सामूहिक ध्वजपूजन करून अयोध्या येथे उभारण्यात येणाºया राममंदिर भूमिपूजन व बांधकाम लवकरात लवकर पूर्ण व्हावे व निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी श्रीफळ वाढविण्यात आले. त्यानंतर मंदिरात महाआरती करण्यात आली. यावेळी पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत भक्तिचरणदास, महंत राजारामदास, बालकदास, रामतीर्थ महाराज, सतीश शुक्ल, भानुदास शौचे, माधवदास राठी, माजी आमदार बाळासाहेब सानप, रामसिंग बावरी, विराज लोमटे आदींसह साधू- महंत उपस्थित होते. मंदिरात तासभर रामनामाचा जयजयकार सुरू असल्याने परिसर जयघोषाने दुमदुमून गेला होता.

मंदिर वही बनायेंगेपंचमुखी हनुमान मंदिरात सामूहिक रामरक्षा आणि हनुमान चालिसा पठण झाल्यानंतर उपस्थित साधू- महंतांनी रामलल्ला हम आयेंगे मंदिर वही बनायेंगे, बच्चा बच्चा राम का जन्मभूमी के काम का, धर्म की जय हो, अधर्म का नाश हो अशा घोषणा देण्यात आल्या.प्रभुरामांना साकडेसंपूर्ण देशभरात सध्या कोरोना सावट पसरलेले आहे. देशात पसरलेले कोरोना संकट लवकर दूर व्हावे आणि विस्कळीत झालेले जनजीवन पुन्हा पूर्ववत व्हावे यासाठी उपस्थित साधू-महंतांनी मंदिरात पूजन करून प्रभू रामचंद्रांना साकडे घातले. 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याTempleमंदिर