शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

रामेश्वर ग्रामपंचायतीची झाली स्मार्ट ग्रामपुरस्कारासाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 15:43 IST

खर्डे ; रामेश्वर ता. देवळा ग्रामपंचायतीची स्मार्ट ग्राम पुरस्कारासाठी निवड झाली आहे. शासनाकडून या ग्रामपंचायतीला १० लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र शासनाकडून मिळणार १० लाखाचे बक्षिस

खर्डे ; रामेश्वर ता. देवळा ग्रामपंचायतीची स्मार्ट ग्राम पुरस्कारासाठी निवड झाली आहे. शासनाकडून या ग्रामपंचायतीला १० लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राज्यातील गावांचा शाश्वत विकास घडवून आणण्याकरीता ग्रामोथ्थान अभियान सुरु करण्यात आलेले आहे. भौतिक, सामाजिक व उत्पन्न साधने या तीन क्षेत्रात शासनाच्या आर्थिक तांत्रिक व प्रशासकिय सहकार्याने, लोकांच्या पुढाकाराने हा विकास अपेक्षित होणार आहे. यापैकी दर्जेदार भौतिक मुलभूत सुविधा साठीचा हा कार्यक्रम आहे.शाश्वत ग्रामविकास संकल्पनेत महत्त्वाचे तत्त्व असे आहे की, गावात एकीकडे उच्च प्रतिच्या भौतिक सुविधांची निर्मिती करतानाच यासाठी लागणाऱ्या नैसर्गिक साधन संपत्तीचा विनियोग पर्यावरणाचा समतोल राखून कसा करता येईल याचाही प्रामुख्याने विचार झाला पाहिजे.दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असून नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास होत आहे. पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करुन समृध्द व संपन्न गांवाची निर्मिती करणे ही काळाची गरज आहे . म्हणून शासनाने पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजना सन २०१०-११ मध्ये सुरु केली. पर्यावरणीय संतुलन राखून गावाचा शाश्वत विकास हा या योजनेचा मूळ उद्देश आहे. तालुका स्मार्ट ग्राम पुरस्कारासाठी पिंपळगांव, मटाने व रामेश्वर या तीन ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. शासनाच्या २१ नोव्हेंबर २०१६ मधील परिशिष्ट "अ " मधील निकषानुसार स्वच्छता ,आरोग्य, सौर ऊर्जा, अटल पेन्शन योजना, पाणी गुणवत्ता, सुकन्या समृद्धी योजना, भूमिगत गटारी, गावात एकही गुन्हा नोंद नसल्याबाबत, बायोगॅस, पथदिवे आदी कामांची समितीने केलेल्या पहाणी अहवालात रामेश्वर ग्रामपंचायत शासनाच्या निकषात बसल्याने सन २०१९ /२० मधील तालुका स्मार्ट ग्राम पुरस्कारासाठी रामेश्वर गावाची निवड करण्यात आली आहे.यासाठी गावाला शासनाकडून १० लाखांचे बक्षीस मिळणार आहे. गावांत स्वच्छतासह विविध विकास कामे करतांना नागरिकांचे सहकार्य मिळाल्यानेच गावाची विकासाकडे वाटचाल सुरू आहे. यामुळे गावाची स्मार्ट ग्राम ग्रामपंचायत म्हणून निवड झाली असून,यापुढेही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन कामकाज केले जाईल, अशी माहिती उपसरपंच विजय पगार यांनी दिली. यावेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेविका आदी उपस्थित होते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतSocialसामाजिक