शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शोकाकुल वातावरणात नाशिक अमरधाममध्ये रमेशसिंह परदेशी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 17:42 IST

आपल्या खोलीत स्वत:वर गोळी झाडून घेतली. गोळीबाराचा आवाज ऐकून त्यांच्या पत्नीने खोलीत धाव घेतली असता रक्ताच्या थारोळ्यात पडलेले परदेशी यांना बघून हंबरडा फोडला.

ठळक मुद्दे शेजारी राहणारे पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे घटनास्थळी धावून गेले.पारी त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा

नाशिक : धुळे ग्रामीण पोलीस दलामध्ये गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षकपदी कार्यरत असलेले रमेशसिंह परदेशी (५८) यांनी आपल्या राहात्या घरात पिस्तुलने गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री उघडकीस आली. परदेशी हे इंदिरानगरमध्ये वास्तव्यास होते. दुपारी त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. शोकाकुल वातावरणात नाशिक अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.धुळे येथील पालेशा महाविद्यालय रस्त्यावरील जुन्या राज्य राखीव दलाच्या मैदानासमोरच्या पोलीस वसाहतीत रमेशसिंह परदेशी कुटुंबासह नोकरीनिमित्त राहात होते. चार महिन्यांनंतर ते पोलीस दलातून निवृत्त होणार होते. परदेशी यांनी पोलीस ठाण्यातून घरी आल्यानंतर रात्री एक वाजेच्या दरम्यान, आपल्या खोलीत स्वत:वर गोळी झाडून घेतली. गोळीबाराचा आवाज ऐकून त्यांच्या पत्नीने खोलीत धाव घेतली असता रक्ताच्या थारोळ्यात पडलेले परदेशी यांना बघून हंबरडा फोडला. यावेळी त्यांच्या आवाजाने शेजारी राहणारे पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे घटनास्थळी धावून गेले. घटनेबाबतची माहिती त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रामकुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांना दिली. तातडीने सर्व अधिकारी घटनास्थळी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. परदेशी यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

त्यांचे पार्थिव सकाळी इंदिरानगरमधील आत्मविश्वास सोसायटी येथे त्यांच्या मूळ निवासस्थानी आणण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नी, ठाण्याच्या लेखाधिकारी कन्या, जावई, मुलगा, सून यांना अश्रू अनावर झाले होते. नातेवाइकांसह मित्रपरिवार मोठ्या संख्येने त्यांच्या अंत्यदर्शनासाठी निवासस्थानी जमले होते. दुपारी त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. नाशिक अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलाने त्यांच्या पार्थिवाला अग्निडाग दिला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर, नारायण न्याहाळदे, मंगलसिंह सूर्यवंशी यांच्यासह पोलीस अधिकारी अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. त्यांच्या मृत्यूने धुळेसह नाशिकमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक