शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात रेमडेसिविरचा काळाबाजार सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 01:30 IST

कोरोना संकटाचा गैरफायदा घेत बाधित रुग्णांसाठी आवश्यक रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्याबाजारात तब्बल ५४ हजार रुपये ज्यादा दराने विक्री करणाऱ्या तीन परिचारिकांसह एका औषधांच्या दुकानातील कर्मचाऱ्यास पोलिसांनी गुरुवारी (दि.१३) रात्री अटक केली आहे. या चौघांनाही न्यायालयाने चार दिवसासाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

ठळक मुद्देतीन परिचारिकांसह चौघांना अटक

नाशिक : कोरोना संकटाचा गैरफायदा घेत बाधित रुग्णांसाठी आवश्यक रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्याबाजारात तब्बल ५४ हजार रुपये ज्यादा दराने विक्री करणाऱ्या तीन परिचारिकांसह एका औषधांच्या दुकानातील कर्मचाऱ्यास पोलिसांनी गुरुवारी (दि.१३) रात्री अटक केली आहे. या चौघांनाही न्यायालयाने चार दिवसासाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.अन्न व औषध प्रशासन विभागासह पोलिसांनी आडगाव शिवारात ही कारवाई केली. एका हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या परिचारिकेसह सिडकोतील मेडिकल दुकानात काम करणारा युवक अन्य संशयितांच्या  मध्यस्थीने रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्या बाजारात विक्री करीत असताना ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी  कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयासमोर सापळा रचत संशयित जागृती शरद शार्दुल (२१), श्रुती रत्नाकर उबाळे (२१) या दोघींना इंजेक्शनची विक्री करताना रंगेहाथ पकडले. त्यांना स्नेहल अनिल पगारे (२२, रा. शांतीनगर मनमाड ) व कामेश रविंद्र बच्छाव (२२, उदय कॉलनी , नाशिक ) हे इंजेक्शन उपलब्ध करून देत असल्याची माहिती समोर  आल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख, अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक सुरेश देशमुख यांच्या पथकाने ही कारवाई केली.संशयितांना पोलीस कोठडीn पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयितांकडून दोन रेमडेसिविर इंजेक्शन, मोबाईल, स्कूटी असा एकूण ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दरम्यान, अटक केलेल्या चौघाही संशयितांना पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने चौघांनाही सोमवारपर्यंत (दि.१७) पोलीस कोठडी सुनावल्याची मोाहिती पोलिसांनी दिली. 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी