शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पादुकांवर रामभक्त होणार नतमस्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 01:19 IST

नाशिक : अयोध्येतील राममंदिराचे निर्माण हा स्वप्नपूर्तीचा दिवस असला तरी त्याठिकाणी मात्र भाविकांना जाणे शक्य होणार नाही. त्यामुळे अयोध्येहून आणलेल्या पादुकांचे पूजन करून नाशिकमधील रामभक्त नतमस्तक होणार आहे. याशिवाय दुपारी गोदाकाठीच आरतीदेखील करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे रामकुंडावर गंगा गोदावरी मंदिराच्या ठिकाणी बुधवारी (दि.५) सकाळपासून हे कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अयोध्येतील राममंदिराचे निर्माण हा स्वप्नपूर्तीचा दिवस असला तरी त्याठिकाणी मात्र भाविकांना जाणे शक्य होणार नाही. त्यामुळे अयोध्येहून आणलेल्या पादुकांचे पूजन करून नाशिकमधील रामभक्त नतमस्तक होणार आहे. याशिवाय दुपारी गोदाकाठीच आरतीदेखील करण्यात येणार आहे.पंचकोटी पुरोहित संघ, विश्व हिंदू परिषद, धर्मसभा आणि वारकरी संप्रदाय अशा विविध संस्थांच्या नाशिकमध्ये रामकुंडावर गंगा गोदावरी मंदिराच्या ठिकाणी बुधवारी (दि.५) सकाळपासून हे कार्यक्रम होणार आहेत. सकाळी सात वाजेपासून दर अर्ध्या तासाने याठिकाणी विविध घटक संस्थाचे रामभक्त प्रातिनिधीक स्वरूपात येऊन याठिकाणी पादुकांचे पूजन करतील. सध्या कोरोना संसर्ग टाळण्यासाठी अनेक प्रकारचे निर्बंध असल्याने शासनाच्या नियमांचे पालन करून हे धार्मिक कार्यक्रम होतील, असे पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी सांगितले.नाशिकमध्ये अनेक राम मंदिरे असले तरी गोदाकाठी खुल्या स्वरूपात कार्यक्रम करता आला असता. परंतु तो करता येणार नाही. त्यामुळे अशाप्रकारचे नियोजन करण्यात आली आहे. नाशिक ही रामभूमी आहे. रामतीर्थ त्यामुळेच पावनदेखील आहे. परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे याठिकाणी असलेल्या पादुका अयोध्येतून आणण्यात आल्या आहेत. अयोध्येतील एका महंतांनी ज्या ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र वास्तव्याला होते, त्या सर्व ठिकाणी भेट देऊन पादुका भेट दिल्या होत्या. त्या पादुकांवरच नाशिकचे रामभक्त नतमस्तक होणार आहेत, असे शुक्ल यांनी सांगितले.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याTempleमंदिर