शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

शहरात रमजान ईद उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 00:30 IST

इस्लामी संस्कृतीचा महान सण रमजान ईद (ईद-उल-फित्र) शुक्रवारी (दि.१४) शहरासह जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने शासनाच्या नियमांचे पालन करत उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षीही शहरातील शहाजहांनी ईदगाहवर सामूहिक नमाज पठणाचा सोहळा होऊ शकला नाही. त्यामुळे मैदानावर शुकशुकाट पसरलेला पहावयास मिळाला.

ठळक मुद्देघरोघरी नमाजपठण : ईदगाह मैदानावर शुकशुकाट

नाशिक : इस्लामी संस्कृतीचा महान सण रमजान ईद (ईद-उल-फित्र) शुक्रवारी (दि.१४) शहरासह जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने शासनाच्या नियमांचे पालन करत उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षीही शहरातील शहाजहांनी ईदगाहवर सामूहिक नमाज पठणाचा सोहळा होऊ शकला नाही. त्यामुळे मैदानावर शुकशुकाट पसरलेला पहावयास मिळाला.मुस्लीम बांधवांनी रमजान पर्वचे तीस निर्जळी उपवास गुरुवारी पूर्ण केले. संपूर्ण महिना धार्मिक कार्यासाठी समाजबांधवांनी वाहून दिलेला होता. अधिकाधिक वेळ अल्लाच्या उपासनेसाठी (ईबादत) देण्याचा प्रयत्न केला जात होता. गुरुवारी चंद्रदर्शन घडले आणि चालू इस्लामी महिना रमजानची सांगता होऊन ‘’शव्वाल’’ महिन्याला प्रारंभ झाला. या इस्लामी महिन्याच्या १ तारखेला शुक्रवारी सकाळी ईद साजरी करण्यात आली. पहाटेपासून मुस्लीम मोहल्ल्यांमध्ये ईदची लगबग दिसून येत होती. नागरिकांनी पहाट उजाडताच दूध खरेदीसाठी गर्दी केली होती. शहरातील जुने नाशिक, वडाळारोड, वडाळागाव, देवळालीगाव, विहितगाव आदी भागांत मशिदीबाहेर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. दरम्यान, कोरोनाच्या संसर्गामुळे यंदा ईदचे नमाजपठण मशिदींमधूनदेखील होऊ शकले नाही यामुळे समाजबांधवांचा काहीसा हिरमोड झाला. आबालवृद्धांनी घरच्या घरीच फातिहापठण व नमाजपठण केले. बाजारपेठा बंद राहिल्याने बहुतांश नागरिकांनी यंदा ईदची खरेदी केली नाही. शिरखुर्म्याचा दरवळला खमंग सुगंधरमजान ईदचे ‘’शिरखुर्मा’’ हे खाद्यपदार्थ विशेष आकर्षण असते. दूध आणि सुकामेवा एकत्र करुन तयार केले जाणाऱ्या या खाद्यपदार्थाचा तसेच शेवयांचा सुगंध शुक्रवारी सकाळी मुस्लीबहुल भागात दरवळलेला जाणवला. ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी घरी येणाऱ्या नातेवाईक, मित्र परिवाराचे शिरखुर्मा देऊन तोंड गोड करण्यात येते.‘जुमा’चे नमाजपठणही घरीकोरोनामुळे मशिदींमध्ये सामुदायिक नमाजपठण बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे गेल्या संपूर्ण रमजान पर्वात समाजबांधवांनी ‘’जुमा’’ अर्थात शुक्रवारची विशेष नमाज घरीच अदा केली. शहरातील बहुतेक मशिदींच्या द्वारावर ‘’मस्जिद बंद हैं’’ असे फलक वाचावयास मिळाले.

सोशल मीडियावर ‘ईद मुबारक’चा वर्षावगुरुवारी संध्याकाळी चंद्रदर्शन घडल्यापासून तर शुक्रवारी दिवसभर सोशल मीडियावर ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. एकापेक्षा एक सरस वॉलपेपर्स, चित्रफितींद्वारे ईदच्या शुभेच्छांची देवाणघेवाण केली जात होती. एकूणच शुभेच्छांच्या संदेशांची गर्दी व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर दिसून आली. 

टॅग्स :NashikनाशिकEid e miladईद ए मिलादReligious programmeधार्मिक कार्यक्रम