शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रदर्शन घडल्याने रमजान पर्वाला प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 22:19 IST

मौलवींनी रमजानबाबत उद्घोषणा करत या पवित्र महिन्यात देशावरील कोरोनाचे महासंकट दूर व्हावे आणि संपूर्ण मानवजातीला सुदृढ निरामय आरोग्य लाभावे, अशी 'दुवा' मागितली.

नाशिक : इस्लामी कालगणनेतील 9वा महिना 'रमजानुल मुबारक'ला शुक्रवारी (दि.25) सायंकाळपासून प्रारंभ झाला या पवित्र महिन्याचे पहिल्या तारखेचे चंद्रदर्शन संध्याकाळी नाशिक शहर व परिसरात सगळ्यांना घडले. विभागीय चांद समिती व सुन्नी मरकजी सिरत समितीद्वारे शहर ए खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांनी रमजान पर्वला सुरुवात झाल्याची घोषणा शाही मशिदीतून केली. त्यानंतर विविध उपनगरांमधील मशिदीमधूनही मौलवींनी रमजानबाबत उद्घोषणा करत या पवित्र महिन्यात देशावरील कोरोनाचे महासंकट दूर व्हावे आणि संपूर्ण मानवजातीला सुदृढ निरामय आरोग्य लाभावे, अशी 'दुवा' मागितली.संयम सदाचार व आत्मशुद्धी चे पर्व म्हणून रमजान ओळखला जातो यंदा समाज बांधवांना अधिक संयम बाळगून रमजान पर्व चे उपवास पार पाडावे लागणार आहे दरवर्षी रमजान पूर्वमध्ये मुस्लिम बांधव सूर्योदयापूर्वी अल्पोपहार घेऊन दिवसभर निर्जळी उपवास अर्थात रोजा करतात सूर्यास्त झाल्यानंतर सायंकाळी फलाहार करून  उपवास पूर्ण करतात यावर्षी रमजान पुरवला एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच कडक उन्हाळ्यात प्रारंभ झाला आहे तसेच कोरोना या  महाभयंकर आजाराचे सावट देखील या रमजानच्या पर्वावर आहे.गेल्या महिनाभरापासून शहर व परिसरातील सर्व मशिदीमध्ये नमाज पठणासाठी झाल्यास नागरिकांना मज्जाव करण्यात आलेला आहे आपत्ती व्यवस्थापन कायदा व संचारबंदी जमाव बंदी कायदा लागू झाल्यामुळे मशीद दर्गा लॉक डाऊन  आहेत इतर तीन मेपर्यंत लोक लावून कालावधी वाढविला गेला असल्यामुळे रमजानचे पहिले आठ उपवास  या काळात  पूर्ण होणार आहेत  दरम्यान  रमजान पर्व मध्ये नागरिकांनी  अधिकाधिक संयम बाळगून कुठल्याही प्रकारची चिंता न करता  आपापल्या घरांमध्ये  पारंपारिक प्रथेप्रमाणे  सर्व धार्मिक कार्यक्रम  शांततेत करण्याचे आवाहन  शहरे खाती  हिसामुद्दिन अशरफी  व  सर्व धर्मगुरु, उलेमांनी केले आहे  कुठल्याही प्रकारे हे या पवित्र महिन्यात  प्रशासनाच्या  नियम व अटी शर्तींचा भंग होणार नाही आणि कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी व खबरदारी घेणे प्रत्येकाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मुस्लीम बांधवांकडून पुढील ३० दिवस ‘रोजा’ (निर्जली उपवास) करण्यात येणार असून, २५ मे रोजी ‘रमजान ईद’ साजरी होणार आहे. रमजानच्या पूर्वसंध्येला भद्रकाली परिसरासह वडाळागाव, भारतनगर, नागजी परिसर, सिडको व सातपूर भागातील बांधवांनी दूध, खजूर, फळे खरेदी करण्यावर भर दिला. कोरोना चे महासंकट आणि त्या दरम्यान सुरु झालेले रमजानपर्व यानिमित्त पोलिस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे.

टॅग्स :RamzanरमजानNashikनाशिक