शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

राम जन्मला गं सखे राम जन्मला..

By admin | Updated: April 6, 2017 01:01 IST

नाशिक : जिल्ह्यात ठिकठिकाणी राम जन्मोत्सवानिमित्त अनेक मंदिरांत विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले

नाशिक : जिल्ह्यात ठिकठिकाणी राम जन्मोत्सवानिमित्त अनेक मंदिरांत विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. येवला, लासलगाव, निफाड व त्र्यंबकेश्वर आदि ठिकाणी उत्साहात मिरवणूक काढण्यात येऊन जन्मोत्सव साजरा करण्यात आला. राम, लक्ष्मण, सीता व हनुमान यांची वेशभूषा करून बालकांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. दुपारी १२ वाजेच्या सुमारास महिलांनी पाळणा सादर केला.लासलगावलासलगाव येथे श्रीराम जन्मोत्सव पारंपरिक पालखी मिरवणुकीला यंदा उत्साहात सुरुवात झाली. हजारो युवक व शेकडो महिला भगव्या टोप्या परिधान करून टाळ वाजवीत श्रीरामाचे भजन गात उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. विविध चित्ररथ या पालखी शोभायात्रेत सहभागी झाले होते. श्रीराम मंदिरासमोर महाआरतीने या पालखीची सांगता झाली. श्रीरामनवमीनिमित्त मंदिराच्या बाहेर रांगा लावून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.येवलायेवला येथील वनवासी श्रीराम मंदिर, गंगादरवाजा येथे प्रभू रामचंद्रांचा मूर्ती महाभिषेक मुंबईतील दत्ता व आशा नानकर, शिवराम व उषा नागपूरकर (इंदूर), निखिल व मोनिका पावलीकर (ठाणे), बंडू क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. नागेश्वर टेकेश्वर आश्रमाचे महंत भास्करगिरीजी महाराज यांच्या प्रभुरामचंद्रांच्या जन्मावर प्रवचन झाले. सुंदरराम मंदिरात गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत भव्य श्रीराम कथा आनंद सोहळा आयोजित करण्यात आला होता. गोरख महाराज काळे यांचे प्रभुरामचंद्रांच्या जन्मावर कीर्तन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रवीण पहिलवान, प्रभाकर झळके, दयानेश्वर नागपुरे, राजेश नागपुरे, जयंत नागपुरे, नारायण घाटकर, मुरलीधर नागपुरे, सुनील नागपुरे, बंडू आहेर, सचिन नागपुरे, मंगेश पैठणकर, विनायक आहेर, अमित लाड, किशोर ठाकूर, संजय टोणपे आदिंनी विशेष परिश्रम घेतले.येथील पाटील वाड्याजवळील विठ्ठल मंदिरात रामनवमीनिमित्त रामजन्मोत्सवाचा कार्यक्रम संपन्न झाला. उत्सवानिमित्त मंदिरात आकर्षक सजावट व रोषणाई करण्यात आली होती. येवले तालुक्यातील प्रसिद्ध श्री रोकडे हनुमान भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी महिला भजनी मंडळही उपस्थित होते. रामजन्मानंतर भजनी मंडळाला अल्पोपहार व सरबताचे वाटप करण्यात आले. भक्तांना पंजिरीचा प्रसाद वाटप झाले. अनेक भाविकांनी या प्रसंगी दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घेतला. उत्सवामुळे परिसरात प्रसन्नतेचे वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमाचे आयोजन ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप पाटील, खजिनदार वसंत संत यांनी केले. रोहित पाटील, सतीश संत, अमित पाटील, बाळासाहेब देशमुख यांनी परिश्रम घेतले. रामनवमीच्या पावनदिनी विविध कार्यक्र म घेऊन रामजन्म उत्सव समितीने प्रभूरामांच्या भव्य पालखीची मिरवणूक काढण्यात आली. सुमारे पाच हजार युवक यात सहभागी झाले होते. यावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सायंकाळी येथील वनवाशी राममंदिरापासून प्रभुरामचंद्र यांच्या प्रतिमेची ७५ युवकांच्या हिंदू राजा ढोल ताशा पथकाच्या वाद्यवृंदाच्या सहभागाने सवाद्य मिरवणूक काढून शहरातील विविध भागातून मार्गस्थ होत विंचूर रोडवर मिरवणुकीची समाप्ती करण्यात आली. प्रभू राम, लक्ष्मण, सीता व हनुमान यांचा सजीव देखावा मिरवणुकीत सादर करण्यात आला, तर मिरवणूक मार्गात सह्याद्री ग्रुपमधली गल्ली येथे रवि पवार, राहुल भावसार, सुनील भावसार, संतोष गायकवाड यांच्यासह कार्यकर्त्यांनी सरबताचे भाविकांना वाटप केले. १५ बाय १५ मीटर भगव्या कापडाचा ध्वज शहरातून मिरवण्यात आला. हरहर महादेव, प्रभुरामचंद्राचा जयजयकार करणाऱ्या घोषणा दिल्या. (लोकमत चमू)