शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिर भाजपाच्या अजेंड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 01:59 IST

भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावर विकासासोबतच राम मंदिराचा मुद्दाही असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

ठळक मुद्देरावसाहेब दानवे : महागाईच्या प्रश्नांना बगल

नाशिक : भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावर विकासासोबतच राम मंदिराचा मुद्दाही असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले.आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे यांनी राज्यातील २८८ विधानसभा मतदासंघ व ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. त्यांनी रविवारी (दि.११) नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदासंघांमधील तयारीचा आढावा घेतला. त्यापूर्वी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक, प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, वसंत गिते, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे आदी उपस्थित होते. दानवे यांनी विकासाच्या मुद्द्यावर भाजपा निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले.गेल्या पंधरवड्यातच पेट्रोलचे दर ९१ रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले असतानाही दानवे यांनी कुठे आहे महागाई? असा प्रतिप्रश्न करीत महागाईच्या प्रश्नांना मात्र बगल दिली. त्यासोबतच धुळे येथील दानवे यांच्या सभेत अनिल गोटे यांच्या गटाने गोंधळ घातल्याच्या मुद्द्यावरही ही संघटनात्मक बाब असल्याचे सांगत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.इन्फो-१नाशकात मतभेद नाहीधुळे येथील आढावा बैठकीत भाजपामधील स्थानिक नेत्यांमध्ये असलेली खदखद प्रत्यक्ष प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासमोर बाहेर पडली. त्यामुळे नाशिकमध्येही भाजपाच्या तिन्ही आमदारांचे वेगवेगळे गट असल्याची चर्चा सुरू झाली असून, अन्य पक्षातून भाजपात आलेल्या नेत्यांचेही स्वतंत्र गट असल्याचे बोलले जात आहे. परंतु, नाशिकमध्ये असे कोणतेही गटतट नसल्याचे सांगत रावसाहेब दानवे यांनी स्थानिक नेत्यांच्या मतभेदांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न के ला.इन्फो-२मत वाढण्यासाठी कोणालाही प्रवेशधुळे येथील सभेत एका संशयित गुंडाने प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यावर स्पष्टीकरण देताना संबंधित व्यक्तीला पक्षात प्रवेश दिला असला तरी कोणतेही पद अथवा जबाबदारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे असा प्रवेश म्हणजे केवळ पक्षाचे एक मत वाढविण्याचा प्रकार असून, अशाप्रकारे मत वाढविण्यासाठी कोणालाही प्रवेश द्यायला हरकत नसल्याची भुमिका त्यांनी घेतली.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाraosaheb danveरावसाहेब दानवे