शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कामगार दिन, महाराष्ट्र दिनानिमित्त  पर्यावरणाच्या संदेशासाठी रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 00:07 IST

येथील नाशिक औष्णिक वीज केंद्र वसाहतीत आंतरराष्ट्रीय कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून, पर्यावरणाचा संदेश घेऊन, रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

एकलहरे : येथील नाशिक औष्णिक वीज केंद्र वसाहतीत आंतरराष्ट्रीय कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून, पर्यावरणाचा संदेश घेऊन, रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.अधिकारी मनोरंजन केंद्र व कामगार मनोरंजन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धनासाठी वॉक फॉर एन्व्हायर्न्मेंट रॅलीच्या माध्यमातून प्रभातफेरी मंगळवारी (दि.३०) आयोजित केली होती. सकाळी ७ वाजता प्रभातफेरीला सुरुवात झाली. सर्व अधिकारी, अभियंते, कर्मचारी, कंत्राटदार व कंत्राटी कर्मचारी यांच्यासह नाशिकरोड भागातील ज्येष्ठ नागरिक सहकुटुंब उपस्थित होते. विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांच्या हस्ते रॅलीची सुरु वात करण्यात आली. शक्तिमान क्र ीडा संकुल येथून या प्रभातफेरीला सुरु वात झाली आणि संपूर्ण वसाहतीत फिरून ही फेरी परत शक्तिमान क्र ीडा संकुलात संपन्न झाली. या फेरीदरम्यान ‘पाणी म्हणजे जीवनाची हमी’, ‘पाण्याविना जीवन नाही’, ‘पाणी वाचवा,जीवन वाचवा’, अशा घोषणा देण्यात आल्या.पर्यावरण वाचवा, झाडे लावा, पाणी आडवा, पाणी जिरवा, वीज वाचवा हा संदेश रॅलीच्या निमित्ताने देण्यात आला. या रॅलीमधे अधीक्षक अभियंता मनोहर तायडे, शशांक चव्हाण, अनेक कार्यकारी अभियंते, अधिकारी, कर्मचारी, याबरोबरच सार्थक ज्येष्ठ नागरिक संघ, परमानंद ज्येष्ठ नागरिक संघ, मेहनत मॉर्निंग वॉक गु्रप, ज्ञानेश्वर माउली ज्येष्ठ नागरिक संघ, महानिर्मिती सेवानिवृत्त संघटना यांनी विशेष सहभाग नोंदवला.वॉक फॉर एन्व्हायर्नमेंट रॅलीच्या माध्यमातून अनेक ज्येष्ठ नागरिकांना सहभागी करून घेण्यात आले. सध्या तीव्र उन्हाळा असल्यामुळे सर्वत्र पाणी टंचाई जाणवते. पाण्याचे योग्य नियोजन व नियंत्रण करण्यासाठी पाणी अडवा-पाणी जिरवा, वृक्ष लावा-वृक्ष जगवा, पर्यावरणाचा ºहास थांबवा, झाडे लावा-निसर्ग वाचवा याबरोबरच विजेची बचत करण्यासाठी वीज वाचविण्याचा संदेशही देण्यात आला. यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी आदींचे सहकार्य लाभले.- उमाकांत निखारे, मुख्य अभियंता, एकलहरे वीज केंद्रज्येष्ठ नागरिकांना एकलहरे वसाहतीतील वॉक फॉर एन्व्हायर्नमेंट रॅलीत सहभागी होण्याची संधी आयोजकांनी उपलब्ध करु न दिली.त्यासाठी आम्हाला ने-आण अरण्यासाठी बसची व्यवस्थाही केली. रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण वीज केंद्राची वसाहत पाहिल्यावर येथील आल्हाददायक वातावरणामुळे मन प्रसन्न झाले. या रॅलीच्या माध्यमातून पर्यावरण व पाणी वाचविण्याचा संदेश देण्यात आला.- एस. एस. वाणी, अध्यक्ष,  परमानंद ज्येष्ठ नागरिक संघवॉक फॉर एन्हायर्नमेंटच्या निमित्ताने एकलहरे वसाहतीत प्रथमच येण्याचा योग आला. येथील पर्यावरणपूरक वातावरण, प्लॅस्टिकमुक्त परिसर, शून्य कचरा, शून्य गळती, ऊर्जा व जलसंवर्धन, मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण, रोपवाटिका, पिस पार्क उद्यानाचे सौंदर्य पाहून मन प्रफुल्लित झाले. शहरापासून काही अंतरावर ग्रामीण भागात अशाप्रकारचे उपक्र म जोपासणे ही कौतुकास्पद बाब आहे. विशेष म्हणजे आम्हा ज्येष्ठ नागरिकांसाठी वाहन उपलब्ध करून देऊन पर्यावरण रॅलीत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली.- हरिदास कुंटे, सेवानिवृत्त अधिकारी,  मेहनत मॉर्निंग वॉक ग्रुप, नाशिकरोड

टॅग्स :environmentवातावरणNashikनाशिक