शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

रक्षाबंधनाला भाऊ-बहिणीचे नाते झाले दृढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 01:04 IST

भाऊ-बहिणीचे बंधुप्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रक्षाबंधन. हिंदू संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त असलेल्या या सणानिमित्त रविवारी (दि.२६) शहरात घरोघरी बहिणीने भाऊरायाचे औंक्षण करीत राखी बांधली.

नाशिक : भाऊ-बहिणीचे बंधुप्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रक्षाबंधन. हिंदू संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त असलेल्या या सणानिमित्त रविवारी (दि.२६) शहरात घरोघरी बहिणीने भाऊरायाचे औंक्षण करीत राखी बांधली.  रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीमधील प्रेम, बंधुभाव अन् विश्वासाच्या नात्याची वीण अधिकाधिक घट्ट करणारा सण म्हणून ओळखला जातो. या सणानिमित्त बहीण आपल्या भावाचे सकाळी औंक्षण करत मनगटावर राखी बांधते. यावेळी भाऊ आपल्या बहिणीला संकटसमयी रक्षण करण्याची अप्रत्यक्षपणे ग्वाही देतो.  शहरात मागील चार ते पाच दिवसांपासून बाजारपेठेत राख्यांनी विविध दुकाने सजली होती. राख्यांच्या खरेदीसाठी महिलांची दुकानांवर गर्दी दिसून येत होती.रक्षाबंधनाला अनोखी भेटरक्षाबंधनाला भावाकडून साडी, मिठाई आदींची भेट देण्याची परंपरा आजतागायत चालत आली आहे. मातोरी येथे सर्पमित्र म्हणून ओळख असलेल्या ^ऋषीकेश कांबळे या युवकाने बहिणींना झाडाची रोपे भेट दिली व सदर झाडांची जोपासना करण्यासाठी त्यांचे संरक्षण करण्याची हमीही दर्शविली. त्याच्या या अनोख्या भेटीचे कौतुक केले गेले. ग्रामीण भागात रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा झाला.नाशिकरोड कारागृहात रक्षाबंधनमध्यवर्ती कारागृहात बंदीबांधवांना विविध सेवाभावी संस्थांमधील महिलांकडून राखी बांधण्यात आली. यावेळी कारागृह अधीक्षक राजकुमार साळी, वरिष्ठ तुरु ंगाधिकारी अशोक कारकर आदी उपस्थित होते. नाशिक सोशल सर्व्हिसेस, मंगलमुखी सेवाभावी ट्रस्ट, धम्मपथ सामाजिक शैक्षणिक संस्था, प्रजापिता ईश्वरी विश्वविद्यालय, ओम साई वेल्फेअर असोसिएशन या संस्थांच्या महिलांनी कारागृहातील बांधवांना औक्षण करून राखी बांधली. कारागृहातील अधिकारी व कर्मचारी यांना विविध संस्थांच्या महिलांनी राखी बांधली.वाल्मीकी नवयुवक संघातर्फे गौतम छात्रालयात रक्षाबंधनअखिल भारतीय श्री वाल्मीकी नवयुवक संघाचे महानगरप्रमुख राहुल चटोले, उपमहानगर प्रमुख रॉनी लव्हेरी यांच्या वतीने रक्षाबंधनानिमित्त गौतम छात्रालय येथील अनाथ आश्रमातील मुलांना महिलांनी राखी बांधली. प्रदेश अध्यक्ष महेशकुमार ढकोलिया, राजेंद्र बागडे, सुरेंद्र मेहरोलिया, आकाश बहोत, विकास ढकोलिया, अनुप बहोत, मोनू खेरवाल, संदीप बागडे, स्वप्नील औटे आदी प्रमुख पाहुणे होते. महिला पदाधिकारी सारिका किर, रिना ढिलोर, पिंकी चटोले, शीतल बहोत, शीतल धिंगाण, लक्ष्मी बहेनवाल, अर्चना पारचे यांनी मुलांना औक्षण करून राखी बांधली.

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनRakhiराखी