येवल्यातील पिक नुकसानीची राजू शेट्टी यांनी केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 09:24 PM2019-11-13T21:24:14+5:302019-11-13T21:24:55+5:30

येवला : शेतकऱ्यांचे हातात आलेले पिक हिसकावले गेल्याने शेतकऱ्यांना मदतीचा आधार देण्याची गरज आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागली तरी राज्यपालांना भेटून तत्काळ जाहीर मदत शेतकºयांना देण्याची मागणी करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजु शेट्टी यांनी दिली.

Raju Shetty reviews crop loss in Yeola | येवल्यातील पिक नुकसानीची राजू शेट्टी यांनी केली पाहणी

अनकाई येथे पिकांच्या नुकसानीची पाहणी करतांना राजु शेट्टी, समवेत डॉ. सुधीर जाधव व शेतकरी.

Next
ठळक मुद्देशेतातील मका व कांदा पिकाच्या नुकसानीची पाहणी

येवला : शेतकऱ्यांचे हातात आलेले पिक हिसकावले गेल्याने शेतकऱ्यांना मदतीचा आधार देण्याची गरज आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागली तरी राज्यपालांना भेटून तत्काळ जाहीर मदत शेतकºयांना देण्याची मागणी करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजु शेट्टी यांनी दिली.
शेट्टी यांनी अनकाई येथे शेतकरी पंडित जाधव व दत्तु देवकर यांच्या शेतातील मका व कांदा पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी सरपंच डॉ. सुधीर जाधव, स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष श्रावण देवरे यांनी तालुक्यातील पिकांच्या नुकसानीची माहिती शेट्टी यांना दिली.
या शेतकºयांशी चर्चा करत त्यांनी नुकसानीची माहिती घेतली. शेतकरी, शेतमजूर अडचणीत असून त्यांना मदतीचा हात देण्यासाठी लवकर शासन स्थापन व्हावे अशी आपली भूमिका असून मी महाआघाडी सोबत आहे. मका, द्राक्ष, कांदे, कपाशी, सोयाबीन आदी पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. सर्व पिके पूर्ण उध्वस्त झाल्याचे जिल्ह्यात पाहिले आहे, त्यामुळे शेतकºयांना आधाराची गरज असून आम्ही नक्कीच आवाज उठवू असेही ते म्हणाले.
तालुक्यात पाऊस कमीच असल्याने खरीप हंगाम निघतो. पण यंदा खरीप हंगाम पावसाने धुऊन नेला आहे. खरीप गेले आता रब्बी हंगामाची शाश्वती नाही. त्यामुळे शासन दरबारी आवाज उठवून शेतकºयांना मोठी आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी शेट्टी यांच्याकडे डॉ. सुधीर जाधव यांनी केली.
यावेळी रविंद्र तळेकर, निलेश चव्हाण, बाबुलाल कासलीवाल, रावसाहेब सोनवणे, गणपत देवकर, आनंदा वैद्य, दिलीप वैद्य, संतोष वैद्य, भिवराज व्यापारे, पंडित जाधव, किरण बढे, नाना सोनवणे आदी उपस्थित होते.
 

Web Title: Raju Shetty reviews crop loss in Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.