शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

शाखाध्यक्षांच्या नियुक्तीवर आज उमटणार ‘राजमुद्रा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 01:32 IST

आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंंडावर संघटनेला बळकटी आणण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर पक्षाचे ब्रॅण्ड ॲम्बेसेडर म्हणजेच शाखाध्यक्ष नियुक्त करण्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रस्ताव अंतिम झाला असून बुधवारी (दि. २२) नाशिक दौऱ्यावर येणारे राज ठाकरे त्यावर शिक्कामोर्तब करणार आहेत.

ठळक मुद्देठाकरे आज नाशकात : संघटनेला बळ देण्यासाठी मोठे बदल

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंंडावर संघटनेला बळकटी आणण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर पक्षाचे ब्रॅण्ड ॲम्बेसेडर म्हणजेच शाखाध्यक्ष नियुक्त करण्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रस्ताव अंतिम झाला असून बुधवारी (दि. २२) नाशिक दौऱ्यावर येणारे राज ठाकरे त्यावर शिक्कामोर्तब करणार आहेत. तत्पूर्वी मंगळवारी (दि. २१) अमित ठाकरे यांच्यासह मुंबईतील नेत्यानी नाशिकमध्ये त्यावर अंतिम हात फिरवला आहे.

मनसेत शाखा अध्यक्षपदाला संघटनेत सर्वात महत्त्वाचे स्थान राहणार असल्याचे राज ठाकरे यांनी घोषित केले. त्या अनुषंगाने गेल्या महिनाभरापासून शाखाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. यानिमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून स्पर्धाही वाढली आहे. पक्षाचे नेते अमित ठाकरे तसेच संदीप देशपांडे यांच्यासह अन्य मान्यवर नेत्यांनी दाेन ते तीन वेळा नाशिकमध्ये ठाण मांडून इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. यंदाच्या दौऱ्यात राज ठाकरे हे शाखाध्यक्षांना थेट नियुक्तीपत्र देणार असून त्यांचा मेळावा घेणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे.

मंगळवारी पक्षाचे युवा नेते अमित ठाकरे यांच्यासह नेते बाळासाहेब नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, अनिल शिदोरे, किशोर शिंदे व योगेश खैरे यांनी राजगड येथे इच्छुकांशी संवाद साधला. या प्रसंगी मनसेचे प्रदेश सरचिटणीस अशोकभाऊ मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार ईचम, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी व दिलीप दातीर, शहराध्यक्ष अंकुश पवार, ज्येष्ठ नगरसेवक सलीम शेख यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकMNSमनसे