घोटीच्या न्हायडी डोंगरावर राजमाता जिजाऊ जयंती विविध उपक्र म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 02:46 PM2020-01-12T14:46:37+5:302020-01-12T14:48:10+5:30

घोटी : राष्ट्रनिष्ठा आण िराष्ट्रनिर्माणाचे प्रतीक असणार्या राजमाता जिजाऊंच्या विचारांतुनच समृद्ध समाजनिर्मिती होईल. हरपलेले समाजभान जागृत करण्यासाठी जिजाऊ जयंतीनिमित्ताने शपथबद्ध होऊया असे प्रतिपादन कळसुबाई मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे यांनी केले. घोटी येथील कळसुबाई मित्र मंडळाच्या वतीने न्हायडी डोंगरावर राजमाता जिजाऊंची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

 Rajmata Jijau Jayanti Various activities on the Nhadi hill of Ghoti | घोटीच्या न्हायडी डोंगरावर राजमाता जिजाऊ जयंती विविध उपक्र म

राजमाता जिजाऊ यांच्या जयंती साजरी करताना घोटी येथील न्हायडी डोंगरावर कळसुबाई मित्रमंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे, मनोहर घोडे, शाहीर बाळासाहेब भगत आदी

Next
ठळक मुद्देकार्यक्र मात स्वच्छतेचा जागर, बेटी बचाओ, अवयवदान जागृती, वाहतुकीच्या नियमांचा जागर करण्यात आला. राजमाता जिजाऊंच्या वेशभूषेतील चिमुकल्या मुलींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. घोटी शहरवासीयांसाठी न्हायडीचा डोंगर आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे. निसर्गाच

  धरणीमाता फाऊंडेशनच्या झाडांना पाणी देण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे यांनी राजमाता जिजाऊंची यशोगाथा वर्णन करून विविध उपक्र मांचे महत्व विशद केले. प्रमुख पाहुणे म्हणून घोटीचे सरपंच प्रा. मनोहर घोडे यांनी कळसुबाई मित्र मंडळाचे मोलाचे योगदान तालुक्यासह राज्यासाठी आदर्श असल्याचे सांगितले. याप्रसंगी शाहीर बाळासाहेब भगत यांनी राजमाता जिजाऊंचे सुश्राव्य पोवाडे सादर केले. सरपंच प्रा. मनोहर घोडे, मंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे, ग्रामपंचायत सदस्य रामदास भोर, जेष्ठ नागरीक अंबादास काळे, अ‍ॅड. सुनिल कोरडे, अभिजीत कुलकर्णी, बाळु साखला, बाळासाहेब भगत, बाळु आरोटे, प्रशांत येवलेकर, अशोक हेमके, गजानन चव्हाण, गोकुळ चव्हाण, सोमनाथ भगत, सोमनाथ भोर, प्रविण भटाटे, नितिन भागवत, लोहरे सर, कदम सर, प्रशांत जाधव, काळु भोर, मिच्छंद्र कोरडे, प्रदीप काकुळते, संतोष म्हसणे, गोविंद चव्हाण, गणेश काळे, संतोष शेवाळे, राहुल हांडे, शिवदास जोशी, गणेश पंढरपुरे, भाऊसाहेब जोशी, सन्नी भोले, मुन्ना अत्तार, जिजाऊंच्या वेशभुषेतील सिद्धी जाधव, आरती भगत, अिश्वनी टोचे, जान्हवी, तन्वी येवलेकर, यशश्री भटाटे, मनिषा, प्रियंका मराडे, सायरा, नगमा खिलफा, रिद्धी व आर्या कुलकर्णी व इतर शिवप्रेमी उपस्थित होते.
 

Web Title:  Rajmata Jijau Jayanti Various activities on the Nhadi hill of Ghoti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.